ETV Bharat / state

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनलेत शोभेची वस्तू - कॅमेरे

भंडारा नगरपालिकेने लावलेले 70 लाखाचे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू बनले आहेत. अडीच वर्ष पहिले मावळत्या नगराध्यक्षांनी हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले होते.

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू
author img

By

Published : Jun 6, 2019, 10:39 PM IST

भंडारा - भंडारा नगरपालिकेने लावलेले 70 लाखांचे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू बनले आहेत. पहिल्या अडीच वर्षात मावळत्या नगराध्यक्षांनी हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले होते. त्यामुळे नव्याने सत्तेवर आलेल्या नगराध्यक्षांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत सर्वसामान्य जनतेच्या पैशाची नासाडी केली असा आरोप होत आहे. तर आता याप्रकरणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी बोलायला तयार नाहीत.

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू

अडीच वर्षापुर्वी भंडारा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी अध्यक्षपदाची मुदत संपण्याच्या 6 महिने अगोदर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवले होते. हे सर्व सीसीटीव्ही लावण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते. त्याच्याकडेच या कॅमेऱ्यांची एक वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी होती. दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्यानंतर सत्तापरिवर्तन झाले. यावेळी इतिहासात पहिल्यांदाच भंडारा नगरपालिकेत भाजपची सत्ता आली. यावेळी नगराध्यक्षपदी सुनील मेंढे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मुद्दाम सीसीटीव्ही देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने हळू-हळू सीसीटीव्ही बंद पडू लागले.

शहरात चोरांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, चोरानीच बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल चोरुन नेली आहे. आता शहरात 50 कॅमेऱ्यांपैकी केवळ 10 ते 12 कॅमेरे शिल्लक राहिले आहेत. तर मागील 2 आठवड्यापूर्वी नगरपालिकेसमोर सुरू असलेले कॅमेरेही आता बंद पडले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरांना पकडणे पोलिसांना कठीण जात आहे.

याविषयी आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी प्रत्येकवेळी टाळाटाळ केली. तर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनीही कॅमेऱ्य़ासमोर बोलण्यास मनाई केली.

Intro:ANC : भंडारा नगर पालिकेने लावलेले 70 लाखाचे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू बनले आहेत. अडीच वर्ष पहिले मावळत्या नगराध्यक्षांनी हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले होते त्यामुळे नव्याने सत्तेवर आलेल्या नगराध्यक्षांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य जनतेच्या पैशाची नासाडी केली आहे. आता या विषयी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यापैकी कोणीही बोलायला तयार नाही.

Body:अडीच वर्ष पहिले भंडारा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती तत्कालीन नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी अध्यक्षपदाची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर या सीसीटीव्ही कॅमेरा चे जाडे संपूर्ण शहरात पसरविले होते. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिला होता त्याच्याकडे एक वर्षाचा मेंटेनन्स होतो. दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या आणि यात सत्तापरिवर्तन झाले, इतिहासात पहिल्यांदाच बीजेपी भंडारा नगरपालिकेत सत्तेवर बसली नगराध्यक्ष म्हणून सुनील मुंडे यांची लोकांनी निवड केली लोकांना बीजेपी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र नागरिकांच्या अपेक्षांवर नगराध्यक्षांनी पाणी फिरवले. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले सीसीटीव्ही मुद्दाम बंद पाडले.

शहरात होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा निर्माण करण्यासाठी या सीसीटीव्हीचा फायदा पोलिसांना होत होता, बरेच वेळा या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरीच्या घटना, खुनातील आरोपी आणि अपहरण केलेल्या मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले. असं असतानाही भाजपाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मुद्दाम सीसीटीवी देखभालीकडे दुर्लक्ष केले परिणामतः हळू हळू हे कॅमेरे बंद पडायला सुरुवात झाली ज्या चोरांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते त्याच चोरांनी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याची केबल चोरली. 50 कॅमेरा पैकी केवळ दहा ते बारा कॅमेरे आता शहरात उरलेले आहेत पंधरा दिवसा अगोदर पर्यंत नगरपालिके समोर असलेले कॅमेरे सुरू होते मात्र मागील पंधरा दिवसांपासून आता सर्वच कॅमेरे पूर्णपणे बंद पडले आहे.
शहरात बस स्टॉप वर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मात्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरांना पकडणे पोलिसांनाही कठीण जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मदत मिळाली असती असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे नगरपालिकेने जरी लावले असले तरी त्याची खरी गरज आणि मदत की पोलिसांना होते त्यामुळे पोलिसांनी त्याचा देखभालीचा खर्च उचलावा असाही सूर मधल्या काळात नगरपालिका मध्ये सुरू होता.
याविषयी आम्ही बरेचदा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रत्येक वेळेस टाळाटाळ केली जणू हा विषय त्यांच्यासाठी अजिबात महत्वाचा नाही एवढेच नाही तर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनीही कॅमेरासमोर बोलण्यास मनाई केली. नगराध्यक्ष आता खासदार झाले त्यामुळे शहरातील बंद पडलेले कॅमेरे पुन्हा सुरू होती अशी माफक अपेक्षा नागरिक करीत आहे.
सत्तेवर असलेले नगराध्यक्ष विविध योजना आणतात त्यावर लाखो- करोडो रुपये खर्च होतात मात्र सत्तापरिवर्तन होताच त्या योजना बंद पडतात असं बरेचदा होत, पण या राजकीय लोकांच्या स्वार्थापोटी, एकमेकणाच्या द्वेषापोटी सर्वसामान्य जनतेचा पैशाचा चुराडा करण्याचा अधिकार या राजकीय लोकांना कोणी दिला असा प्रश्न निर्माण होतो.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.