ETV Bharat / state

रानभाज्या महोत्सव नेमका कोणासाठी? कृषी विभाग म्हणतो आम्हीच लाभार्थी!

author img

By

Published : Aug 14, 2020, 2:53 PM IST

सामान्यतः कृषी विभाग ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, आता शहरातील लोकांनाही सेंद्रीय आणि अन्य नैसर्गिक गोष्टी फायद्याच्या वाटू लागल्याने तेही याकडे वळले आहेत. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने त्याला अनुसरुन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरु केला.

Wild Vegetables Festival
रानभाज्या महोत्सव

भंडारा - जिल्ह्यात 11 ऑगस्टला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती फक्त कृषी विभाग आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यानांच होती. ज्या सामान्य जनतेसाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते त्या सर्वसामान्य जनतेला याची पुसटशी कल्पना नव्हती. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन नेमके कोणासाठी केले गेले? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करताना अधिकारी

लोकांना काय हवे, हे लक्षात घेऊन उपक्रम राबवण्याची प्रथा सध्या आली आहे. सामान्यतः कृषी विभाग ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, आता शहरातील लोकांनाही सेंद्रीय आणि अन्य नैसर्गिक गोष्टी फायद्याच्या वाटू लागल्याने तेही याकडे वळले आहेत. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने त्याला अनुसरुन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरु केला. आंबा महोत्सव, तांदूळ महोत्सव यासारखे महोत्सव कृषी विभाग आवर्जून दरवर्षी भरवतो. मात्र, त्याचा फायदा सामान्यांपर्यंत कितपत पोहचतो, हे त्यांनाच माहित.

पावसाळ्यात लोकांचा कल रानभाज्यांकडे आहे. म्हणून वरिष्ठांच्या फर्मानानुसार कृषी विभागाच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी रानभाज्या महोत्सव भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संकल्पना आणि हेतू अत्यंत स्तुत्य असाच होता. परंतु शासकीय यंत्रणेसाठी या दोन्ही गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतात. त्यांना केवळ पांढऱ्याचे काळे कागदे करुन सोपस्कार पूर्ण केल्याचे समाधान हवे असते. रानभाज्या महोत्सवाचेही काहीसे असेच झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, भाज्या घेऊन आलेले निवडक शेतकरी होते. मात्र, भाजीपाला खरेदी करण्यास कोण सामान्य नागरिक दिसलेच नाहीत. कारण या कार्यक्रमांची माहिती योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही.

दोन-चार दिवसात जिल्ह्यात असे महोत्सव तालुक्याच्या ठिकाणी झाले. अधिकाऱ्यांचे फित कापताना फोटो निघाले आणि महोत्सव झाल्याचे सोपस्कार पूर्ण झाले. परंतु साध्य न झालेल्या हेतूचे काय? ज्यांच्यासाठी हा खटाटोप केला जातो, त्यांनाच जर माहित नसेल तर होणारा खर्च कशासाठी हा प्रश्न पडतोच?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.