ETV Bharat / state

भंडारा : दोन दिवसांपासून सुरू असलेले रुग्णवाहिका चालकांचे उपोषण मागे - bhandara latest news

कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 43 रुग्णवाहिका चालकांचे दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज खासदार सुनील मुंढे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.

ambulance drivers hunger strike has been over in bhandara
भंडारा: दोन दिवसांपासून सुरू असलेले रुग्णवाहिका चालकांचे उपोषण मागे
author img

By

Published : Nov 25, 2020, 8:43 PM IST

भंडारा - राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 43 रुग्णवाहिका चालकांचे दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज खासदार सुनील मुंढे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. वेतन वाढ, बोनस आणि अन्य मागण्यांसाठी 24 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू होते.

2007पासून आहेत कामावर-

जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील 43 रुग्णवाहिका चालक 2007पासून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या वाहनचालकांचे वेतन सुरुवातीला जिल्हा परिषदेतर्फे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिले जात होते. त्यानंतर बीवीजी या खासगी कंपनीच्या माध्यमातून या चालकांना वेतन देण्यात येत होते. 2018पासून अशोकॉम मीडिया इंडिया लिमिटेड, भोपाल या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या वाहनचालकांचे वेतन ही कंपनी अदा करीत होती. मात्र, कंपनी नेहमीच या चालकांवर अन्याय करीत होती.

अविनाश फुले यांची प्रतिक्रिया
जिल्हा परिषदेसमोर सुरू होते आंदोलन-मागील दोन वर्षांपासून या कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध या 43 रुग्णवाहिका चालकांनी उपोषण सुरू केले होते. मागील 2 वर्षात अतिरिक्त भत्ता न मिळणे, नियमित वेतन न होणे, वेतनात न झालेली वाढ, दिवाळीच्या काळात न मिळणारा बोनस, वाहनचालकांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान मिळण्याची मागणी, वाहन चालकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कोरोना काळात सेवा देणाऱ्या वाहन चालकांना प्रोत्साहन भत्ता, अशा मागण्या घेऊन 24 नोव्हेंबरपासून या वाहनचालकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू होते. खासदार सुनील मेंढे यांनी उपोषण मंडपाला दिली भेट- कंपनी करत असलेल्या या अन्यायाविरोधात याआधीही आंदोलन करण्यात आले होते. तेव्हाही या चालकांच्या समस्या सोडविण्याचे अश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले होते. मात्र, आद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. आज खासदार सुनील मेंढे यांनी उपोषण मंडपाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा झाली. नऊ डिसेंबरपर्यंत शक्य तेवढ्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच खासदारांच्या हस्ते नारळ पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले.9 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन-

वाहनचालक अनेकदा आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत आलेत, त्यांच्या मागण्यांच्या दृष्टीने मी पाठपुरावा करीत आहे. नऊ डिसेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन आता देण्यात आले आहे. 9 तारखे पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आपण स्वतः कंपनीच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू आणि वाहनचालकांना न्याय देण्यासाठी दिल्ली मुंबईपर्यंत पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.