ETV Bharat / state

पवनीमध्ये टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी - भंडारा बातम्या

पवनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या निष्ठीजवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र दिलीप भोयर याचा मृत्यू झाला. तर निखिल अनेश्वर सोनटक्के जखमी झाला आहे.

भंडारा
author img

By

Published : Jul 11, 2019, 7:36 AM IST

भंडारा - पवनी तालुक्यात टिप्परच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान झाला.

पवनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या निष्ठीजवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र दिलीप भोयर (वय 22 रा. धानोरा ता. पवनी) याचा मृत्यू झाला. तर निखिल अनेश्वर सोनटक्के (वय 24 रा. धानोरा ता. पवनी) जखमी झाला आहे. हे दोघे मोटारसायकलने भिवापूरकडून पवनीकडे येत असताना निष्टीजवळ भरधाव वेगाने मागून येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. यात नरेंद्रच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला निखिल जखमी झाला, त्याच्या डोक्याला व पायाला मार लागला. त्याला पवनी येथे प्राथमिक उपचार करून भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

धडक देणारा टिप्पर हा भिवापूरकडून पवनीकडे भरधाव वेगाने येत होता. त्याने अनेकांच्या गाड्यांना कट मारून निघून गेल्याची चर्चा असून घटना घडताच टिप्पर घटनास्थळावरून पसार झाला. पवनी पोलिसांना आता हा टिप्पर शोधणे एक आव्हान आहे. अगोदरही या भागात रेतीच्या टिप्परने अपघात झाल्याने एकाच मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी टिप्पर जाळले होते आणि जवळपास 4 तास रस्ता रोखला होता.

Intro:Body:ANC : पवनी तालुक्यात टिप्पर च्या धडकेत एका तरुणांचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
पवनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या निष्ठी जवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र (प्रद्युम्) दिलीप भोयर वय 22 वर्षे राहणार धानोरा तह. पवनी जिल्हा भंडारा तर जखमी झालेल्या युवकाचे नाव निखिल अनेश्वर सोनटक्के वय 24 वर्षे राहणार धानोरा तह पवनी जिल्हा भंडारा असे नाव असून सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान मोटारसायकल नि भिवापूर कडून पवनी कडे येत असताना निष्टी जवळ भरधाव वेगाने मागून येणाऱ्या टिप्पर ने जोरदार धडक दिल्याने मृतक नरेंद्र याला डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला निखिल याला हाताला, डोक्याला व पायाला मार लागला असून पवनी येथे प्राथमिक उपचार करून भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
धडक देणारा टिप्पर हा भिवापूर कडून पवनी कडे भरधाव वेगाने येत होता. त्याने अनेकांच्या गाड्या ना कट मारून निघून गेल्याची चर्चा असून घटना घडताच टिप्पर घटनास्थळा वरून पसार झाला असून पवनी पोलिसांना अपघात कारविणाऱ्या टिप्पर शोधणे एक आवाहन आहे. या अगोदर ही या भागात रेती चे टिप्पर ने अपघात झाल्याने एकाच मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी टिप्पर जाळले होते आणि जवळपास 4 तास रस्ता जाम केले होते, पवनी तालुक्यात असलेल्या वैनगंगा नदीच्या पत्रातून अवैध वाळू उपसा केला जातो आणि नंतर हे टिप्पर चोरी पकडण्याच्या भीतीने भरधाव पडतात आणि त्यातूनच असे अपघात होतात.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.