ETV Bharat / state

निवासी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे १०वीचे परीक्षा अर्ज भरलेच नाहीत, जोरदार ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Jan 22, 2020, 8:46 PM IST

तुमसर तालुक्याच्या अंबागड येथील समर्थ आदिवासी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, संस्थापकाने आडमुठेपणा करत या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊच दिले नाही. या गोंधळात या विद्यार्थ्यांचे १०वीचे परीक्षा अर्ज शाळेने भरलेच नाहीत. यामुळे तेथील विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची वेळ आल्याने त्यांनी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात भंडारा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

सिनेट सदस्यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

भंडारा - जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या अंबागड येथील समर्थ आदिवासी निवासी शाळेतील ३४ विद्यार्थ्यांचे दहावीचे परीक्षा अर्ज न भरल्याने या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. हे परीक्षा फॉर्म भरावे या मागणीसाठी बुधवारी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघटनांनी भंडारा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरले जाणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहणार, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

अंबागड येथील निवासी आश्रम शाळा ही वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. दोन वर्षाअगोदर या निवासी शाळेतील एका विद्यार्थ्याचा कडुनिंबाच्या झाडावर चढताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही शाळा बंद होती, सन २०१९ मध्ये ही शाळा जुन्या संस्थापकाकडून काढून राजेंद्र भैसारे, नागपूर यांना हस्तांतरित करण्यात आली. भैसारे यांनी ही निवासी आश्रमशाळा सुरू केली. मात्र, या शाळेत ५ ते ९ पर्यंत केवळ एक विद्यार्थी शिकत होता. तर, दहाव्या वर्गात ३४ विद्यार्थी होते. तसेच शिक्षक भरती नव्हती आणि अत्यावश्यक असलेल्या सुविधांचाही मोठ्या प्रमाणात अभाव होता. त्यामुळे शासनातर्फे जून महिन्यातच त्याची मान्यता काढण्यात आली आणि या ३४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, संस्थापकाने आडमुठेपणा करत या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊच दिले नाही.

न्यायालयातून शासनाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी या संस्थांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, या सगळ्या गोंधळात या ३४ विद्यार्थ्यांचे त्यांनी परीक्षा अर्ज भरलेच नाही. यात दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आता निघून गेली आहे. तसेच पुढच्या महिन्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. मात्र, अर्ज भरला गेला नसल्याने या विद्यार्थ्यांना आता दहावीची परीक्षा देता येणार नाही.

हेही वाचा - टोमॅटोवर करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल

विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या कानावर पडताच त्यांनी शिक्षण विभाग, प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी नेत्यांना घेऊन त्यांनी बुधवारी आंदोलन केले. तर, अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आदिवासी विभागात गोंधळ उडाला. मागील ६ महिन्यांपासून झोपेत असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून विद्यार्थ्यांचे उशिरा शुल्क भरून त्वरित अर्ज भरण्यास सांगितले. मात्र, यामुळे आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. जोपर्यंत हे अर्ज भरले जाणार नाही, तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहील, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा - अस्वलाच्या पिल्लाचे दोन दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी करताहेत देखभाल

Intro:ANC :- तुमसर तालुक्याच्या अंबागड येथील समर्थ आदिवासी निवासी शाळेतील 34 विद्यार्थ्यांचे दहावीचे परीक्षा फॉर्म न भरल्याने या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. हे परीक्षा फॉर्म भरावे या मागणीसाठी बुधवारी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघटनांनी भंडारा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले जाणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहणार अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

Body:अंबागड येथील ही निवासी आश्रम शाळा वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिली दोन वर्ष अगोदर या निवासी शाळेतील एक विद्यार्थी कडू लिंबाच्या झाडावर चढून दातून तोडण्याचा प्रयत्न करीत असतांना विजेचा धक्का लागल्याने मृत पावला होता. तेव्हापासून ही शाळा बंद होती, 2019 मध्ये ही शाळा जुन्या संस्थापकाकडून काढून राजेंद्र भैसारे, नागपूर यांना हस्तांतरित करण्यात आली.
भैसारे यांनी ही निवासी आश्रम शाळा सुरू केली मात्र या शाळेत पाचवी ते नववीपर्यंत केवळ एक विद्यार्थी शिकत होता. तर दहाव्या वर्गात 34 विद्यार्थी होते. तसेच शिक्षक भरती ही नव्हती आणि अत्यावश्यक असलेल्या सुविधांचा ही मोठ्या प्रमाणात अभाव होता. त्यामुळे शासनातर्फे जून महिन्यातच त्याची मान्यता काढण्यात आली आणि या 34 विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्याचे आदेश देण्यात आले मात्र संस्थापकाने आडमुठेपणा करत या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊच दिले नाही.

न्यायालयातून शासनाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी या संस्थांनी प्रयत्न सुरू केले, मात्र या सगळ्या गोंधळात या 34 विद्यार्थ्यांचे त्यांनी परीक्षा फॉर्म भरलेच नाही. दहावीच्या परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आता निघून गेली आहे. तसेच पुढच्या महिन्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत मात्र फॉर्म भरल्या गेला नसल्याने या विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देता येणार नाही.

विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान सिनेट सदस्य प्रवीण उदापूर यांच्या कानावर पडताच त्यांनी शिक्षण विभाग, प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता केवळ उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी नेत्यांना घेऊन त्यांनी बुधवारी आंदोलन केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आदिवासी विभागात गोंधळ उडाला. मागील 6 महिन्यांपासून शांत झोपेत असलेले आदिवासी अधिकारी यांनी शाळेतील मुख्याध्यापकांना फोन करून विद्यार्थ्यांचे उशिरा शुल्क भरून त्वरित फॉर्म भरण्यास सांगितले. मात्र यामुळे आंदोलनकर्त्यांची समाधान झाले नाही जोपर्यंत हे फॉर्म भरले जाणार नाही तोपर्यंत आमचा ठिय्या आंदोलन असाच सुरू राहील अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती.

बाईट : प्रवीण उदापुरे, सिनेट सदस्य
प्रशांत उके, आदिवासी विद्यार्थी नेता
नयन कांबळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, भंडारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.