ETV Bharat / state

Beed Crime : भरदिवसा बसस्थानक परिसरात तरुणाची हत्या, घटनेने खळबळ - बीड खून बातमी

बीड शहरातील बसस्थानक परिसरात भरदिवसा एका तरुणाची अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञ

c
c
author img

By

Published : Dec 15, 2021, 7:09 PM IST

बीड - शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात भरदिवसा झालेल्या हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अज्ञात तीन ते चार मारेकरऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करून शेख शाहीद शेख सत्तार ( वय 24 वर्षे) या तरुणाचा खून केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी चारच्या सुमारास घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेली माहिती अशी, शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 वर्षे, रा. खासबाग, बीड) याचा बसस्थानकासमोरील बँकेसमोर सायंकाळी 4 वाजता अज्ञात कारणावरून वाद झाला. यादरम्यान त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तरुणाच्या हत्येचे वृत्त पसरताच शहरात खळबळ उडाली. जिल्हा रुग्णालय परिसरात लोकांची गर्दी होत असल्याने खबरदारी म्हणून तेथे फौजफाट्यासह पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह ठाणे प्रभारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आवारातील सीसीटीव्ही फुटेज आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे ही वाचा - Gopinath Munde Birth Anniversary : मुंडे भगिनींनी केली कष्टकरी, कामगारांची सेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.