ETV Bharat / state

बीड: कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने मृतदेह गावाकडे नेत होतो, मृत महिलेच्या भावाचा खुलासा - corona patient deadbody

जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेह घरी नेल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे. मृत महिलेच्या भावाने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांनी मृतदेहांची अवहेलना केल्याचा आरोप करत पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. माझ्या बहिणीची चाचणी निगेटिव्ह असताना तिचा मृतदेह सुरुवातीला घेऊन जाण्यास सांगितले आणि नंतर अर्ध्या वरून परत बोलवून घेत उलट आमच्या विरोधात मृतदेह पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बीड लेटेस्ट न्यूज ,  बीड कोरोना न्यूज ,  कोरोनाबाधिताचा मृतदेह पळवला ,  कोरोनाबाधितेचा मृतदेह परवानगीशिवाय नेला ,  beed corona ,  corona patient deadbody
बीड
author img

By

Published : May 18, 2021, 10:30 AM IST

बीड- येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी परस्परच पळवल्या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडला होता. आता या प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या भावाने खुलासा केला असून म्हटले आहे की, मागील 28 दिवसापासून माझी बहीण जिल्हा रुग्णालयात कोरोनाशी लढत होती. मृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे सर्वांच्या समक्ष मृतदेह गावाकडे घेऊन चाललो होतो.

जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेह घरी नेल्याच्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले आहे. मृत महिलेच्या भावाने जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांनी मृतदेहांची अवहेलना केल्याचा आरोप करत पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. माझ्या बहिणीची चाचणी निगेटिव्ह असताना तिचा मृतदेह सुरुवातीला घेऊन जाण्यास सांगितले आणि नंतर अर्ध्या वरून परत बोलवून घेत उलट आमच्या विरोधात मृतदेह पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घरातील व्यक्तीच्या निधनामुळे आधीच दुःखाचा डोंगर आमच्या वर कोसळला असताना त्यात मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप मृत महिलेचे भाऊ वकील सुभाष काबाडे यांनी केला आहे. तसेच जिल्हाशल्य चिकित्सक सूर्यकांत गीते, अतिरिक्त शल्य चिकित्सक सुखदेव राठोड, वॉर्डातील, वैद्यकीय अधिकारी गुट्टे, कर्मचारी, वार्ड बॉय यांनी आमची दिशाभूल करून मृतदेहाची अहवेलना केली. या विरोधात रीतसर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक पाच मधून नातेवाईकांनी मृतदेह परस्पर वैद्यकीय तपासणी न करता घेऊन गेल्याची तक्रार वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना केली होती. यानंतर आता नातेवाईकांनी आरोग्य प्रशासनावर मृतदेहाची अवहेलना केल्याचा आरोप लावला आहे. मृताच्या भावाने सांगितले की, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संमतीने आम्ही मृतदेह घेऊन गेलो होतो आणि मृत देहाची दोन वेळा अँटिजेन टेस्ट निगेटीव्ह असल्यामुळे मृतदेह घेऊन जाण्यास परवानगी दिली होती.

सोमवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला आणि सकाळी टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून आम्ही विनंती केली की, आमच्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात द्या. रुग्णालयाकडून मृतदेह नेण्यास परवानगी देण्यात आली, मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत मृतदेह पुन्हा आणण्यास सांगण्यात आले. तशीच गाडी आम्ही मागे घेऊन आलो. रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला. प्रशासनाला सहकार्य केले तरी पण रुग्णालय प्रशासनाने आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे. या प्रकरणात मृतदेहाची विटंबना झाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मृत महिलेचे भाऊ सुभाष काबाडे यांनी केली आहे.

हेही वाचा - 'म्यूकर मायकोसिस'वरील औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी, अजित पवारांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.