ETV Bharat / state

बीडमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत - Beed latest news

धारुर तालुक्यातील मुन्ना नाईक तांड्यासह आजूबाजूच्या 20 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुन्ना नाईक तांडा येथे तीनशे-साडेतीनशे लोकांची लोकवस्ती आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासून येथील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

Beed
हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत
author img

By

Published : May 4, 2020, 7:25 PM IST

बीड - कोरोना विषाणूच्या संकटाबरोबरच पाणी टंचाईचे संकट बीड जिल्ह्यावर ओढावले आहे. अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात उंमरेवाडीतील मुन्ना नाईक तांडा येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायऱ्या नसलेल्या विहिरीतून जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागत आहे.

हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत

धारुर तालुक्यातील मुन्ना नाईक तांड्यासह आजूबाजूच्या 20 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुन्ना नाईक तांडा येथे तीनशे-साडेतीनशे लोकांची लोकवस्ती आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासून येथील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याने येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे पाणी मागायचं तरी कोणाकडे? हाच प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला असल्याचे येथील नागरिक दीपक राठोड यांनी सांगितले आहे. आमचा पाण्याचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने तत्काळ सोडवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.