बीड : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकींची ( Grampanchayat Election ) रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूकी निमित्ताने विविध प्रकरणे समोर येत आहेत. बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
मतदाराच्या अनुपस्थितीत मतदान : बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदार दक्षिण आफ्रिकेत ( Voters in South Africa ) नोकरी करत आहे त्याचे मतदान गावात झाल्याने खळबळ उडाली आहे. चिखली गावातील मतदान केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदार यादी क्रमांक 145 -शेख शकील बाबामिया अस मतदान झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो सध्या गावामध्ये उपस्थित नसताना त्याच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले.
गावकऱ्यांनी केली तक्रार : ग्रामपंचायत निवडणूक ( Grampanchayat Election ) झालेल्या मतदानावर आक्षेप घेत थेट गावकऱ्यांनी तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदान केंद्र अधीक्षक यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.