बीड : बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई परळी रस्त्यावर घाटात परळीतील तीन युवक आंबेजोगाई येथे काही कामानिमित्त गेले होते. परतत असताना अंधार असल्याने संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणारी ट्रॉली त्यांना दिसली नाही. त्यामुळे दुचाकी ट्रॉलीला जाऊन धडकली. त्यामध्ये दोन युवक जागीच मरण पावले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू : झालेल्या अपघात परळीतील बँक कॉलनीत राहणारे व्यंकटेश कांदे, रोहित भराडीया राहणारे पद्मावती गल्ली, शुभम धोकाटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी असा या युवकांचा समावेश आहे. या अपघातामध्ये दोघांची प्राणज्योत मालवली आहे. तर एकावर आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरी एक घटना सोलापूरजवळ घडली.
तर दुसरी घटना : धुळे-सोलापूर नॅशनल हायवे 52 वर मोठा आपघात झाला. या अपघातात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा मृत्यू झाला. यात त्यांच्यासोबत असलेले दुसरे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा गेवराई पोलीस स्टेशनचा हद्दीत गढी नजीक कार अपघातात मृत्यू झाला आहे.
कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात ब्रेजा कारने चार ते पाच पलट्या घेतल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर हा अपघात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीला वाचवताना घडला असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली. घटनास्थळी जमादार साजेद सिद्दीकी पुढील तपास करीत आहे व अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव माणिक रायजादे वय 65 असे आहे.
पुण्यातही अपघातांचे सत्र : पुणे शहरातील नवले पूल परिसरात नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पूल चौकात अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.