ETV Bharat / state

डाक विभागाकडून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्ययाचा गौरव, पोस्टल इन्व्हलपचे ३ जुनला होणार लोकार्पण - डॉ. प्रितमताई मुंडे

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून, भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे यांच्या पुण्यतिथीला (३ जून) रोजी होत आहे. दिल्लीसह परळी वैजीनाथ येथील गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे
स्व. गोपीनाथ मुंडे
author img

By

Published : Jun 2, 2021, 12:31 AM IST

बीड (परळी वैजेनाथ) - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे यांच्या पुण्यतिथीला (३ जून) रोजी होत आहे. दिल्लीसह परळी वैजीनाथ येथील गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी कायम समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला. (३) जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न घेण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतलेला आहे.

डाक विभागाकडून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्ययाचा गौरव, पोस्टल इन्व्हलपचे ३ जुनला होणार लोकार्पण

पोस्टल इन्व्हलपचे लोकार्पण

लोकनेते मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून, त्याचे ऑनलाईन विमोचन ३ जून रोजी दुपारी १ वा. होणार आहे. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत हे विमोचन होणार आहे. या ऑनलाईन स्वरूपाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, खा. डाॅ. भागवत कराड आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाइन असल्याने त्याची लिंक राज्यातील सर्व नेते, आमदार, खासदार व पदाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच, पंकजा मुंडे यांच्या फेसबुकवरूनही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दरम्यान. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे फेसबुकवरून सर्वांना संबोधित करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.