ETV Bharat / state

स्वाराती रुग्णालयाला मिळणार अद्ययावत 3 टेस्ला एमआरआय मशीन; 'हाफकीन' कडून खरेदी ऑर्डर प्रसिद्ध - एम आर आय मशीन

स्वाराती रुग्णालयास काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या 3 टेस्ला एम.आर.आय मशीन खरेदी करण्यासाठीची 16 कोटी 15 लाख रुपयांची खरेदी ऑर्डर हाफकीन संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मशीन अंबाजोगाई येथे पोहोचवून इन्स्टॉल करून देणे, ही जबाबदारी या ऑर्डरनुसार ‘फिलिप्स’ या पुरवठादार कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Apr 28, 2021, 7:16 PM IST

अंबाजोगाई (बीड) - पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वराती रुग्णालयात अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. स्वाराती रुग्णालयास काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या 3 टेस्ला एम.आर.आय मशीन खरेदी करण्यासाठीची 16 कोटी 15 लाख रुपयांची खरेदी ऑर्डर हाफकीन संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मशीन अंबाजोगाई येथे पोहोचवून इन्स्टॉल करून देणे, ही जबाबदारी या ऑर्डरनुसार ‘फिलिप्स’ या पुरवठादार कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ही प्रक्रिया साधारणतः 50 दिवसाच्या आत पूर्ण केली जाईल, अशी माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.

एम आर आय करण्यासाठी या भागातील नागरिकांना हजारो रुपये खर्चून अन्य शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी धनंजय मुंडे यांनी हाफकीन मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एम आर आय मशीनसाठी सातत्याने पाठपुरावा केला. विभागाने सुरुवातीला 1.5 टेस्ला मशीन खरेदीस परवानगी दिली होती. परंतु धनंजय मुंडे यांनी अद्ययावत प्रणालीच्या 3 टेस्ला मशीनचा आग्रह केला. अखेर ही मशीन खरेदी केली जात असून, ही मशीन बसविण्यासाठीच्या जागी आवश्यक सुविधा निर्माण करून 50 दिवसांच्या आत ती बसविण्यात येईल. तसेच या एम आर आय मशीनला ऑपरेट करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात येईल. कमी वेळेत मशीन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे डॉ. सुक्रे यांनी आभार मानले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.