बीड: गावातील लोकांनी त्याची भव्य मिरवणूक काढत सत्कार केला.आई-वडिलांच्या कष्टाचे चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या शिवाय मी शून्य आहे. आई-वडिलांनी माझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केले. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलो. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले माझे सावरगाव घाट या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे याने म्हटले आहे.
काय म्हणतात संतोष खाडे? नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसेवा 2021 मध्ये माझा 16 क्रमांक आला आहे आणि एनटीडी प्रवर्गातून प्रथम क्रमांक आलेला आहे. अजून कुठलीही पोस्ट किंवा पद निश्चित झालेले नाही. मात्र थोड्याच दिवसात लोकसेवा आयोग जाहीर करतील. माझ्या यशाचे सर्व श्रेय मी माझ्या आई-वडिलांना देतो. कारण त्यांनी फार कष्ट करून मला शिकवले. ते ऊस तोडणी कामगार आहेत. त्यांनी मी शिक्षण घेत असताना मला कुठलीही अडचण येऊ दिली नाही आणि मी हे शिक्षण पूर्ण करू शकलो. एमपीएससीमध्ये मला घवघवीत यश मिळवता आले. सर्व मित्र कंपनीचा या माझ्या यशामध्ये वाटा आहे. त्यांनी माझे मनोबल उंचावल्याने परीक्षेत यश मिळू शकले.
काय म्हणतात नागेश लाड? बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी गेली अनेक वर्ष एमपीएससीमध्ये तयारी करत होतो. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि मला अडचणीचा सामना करावा लागला. मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी माझ्या ऊसतोड कामगार कुटुंबाला देतो. त्याचबरोबर पाटोदा तालुक्यातील जे तरुण-तरुणी आहेत त्यांच्यासाठी मी असे आवाहन करू इच्छितो की, आपणही अशाच पद्धतीने यश मिळवा आणि आपल्या आई-वडिलांबरोबरच गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर घेऊन जा. आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना तुम्ही लढत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.