ETV Bharat / state

सहा महिलांनी एकत्र येत उभारला उद्योग; 50 कुटुंबांना दिला आधार - नारीशक्ती महिला संस्था बीड

महिलांनी एखाद्या संकटाचा धैर्याने सामना करायचे ठरवले तर कितीही मोठे संकट त्यांच्यासमोर मान झुकवते. बीडमधील सहा महिलांनी असेच काहीसे करून दाखवले आहे. त्यांनी एकत्र येत ५० बेरोजगार महिलांना रोजगार दिला आहे.

Narishakti Mahila Sanstha
नारीशक्ती महिला संस्था
author img

By

Published : Jan 23, 2021, 6:57 AM IST

बीड - शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय काही महिलांनी नारीशक्ती महिला संस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची किमाया साधली आहे. बीडमधील सहा महिलांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिलाई उत्पादन तयार केले. यामध्ये पंजाबी ड्रेस, मास्क, परकर यासारख्या वस्तू उत्पादित केल्या. यामुळे कोरोना नंतरच्या बिकट परिस्थितीत समाजातील गोरगरीब 50 महिलांच्या हाताला काम मिळाले. शिवाय नारीशक्ती संस्थेचे मोठे काम देखील उभे राहिले असल्याचे, नारी शक्ति संस्थेच्या सदस्य शालिनी परदेशी आणि ललिता तांबारे या मोठ्या अभिमानाने सांगतात.

सहा महिलांनी एकत्र येत उभारला उद्योग

लॉकडाऊनमुळे कुटुंबांवर आले होते संकट -

शालिनी परदेशी, ललिता तांबारे, निता कांबळे, शीतल जाधव, संगीता कोकीळ व दिपाली वंजारे या सहा मैत्रिणींनी विचार करत एकत्र येऊन दोन वर्षापुर्वी बीडमध्ये नारीशक्ती महिला संस्था स्थापन केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात कोरोनाचे संकट आले. या काळात अनेक महिलांच्या हातातील काम गेले. परिणामी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. अशा बिकट परिस्थितीत गोरगरीब महिला शालिनी परदेशी यांच्याकडे काही काम आहे का? म्हणून काम मागायच्या, तेव्हा या गोरगरीब महिलांना काय काम द्यावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. शालिनी परदेशी आणि त्यांच्या मैत्रिणींनी कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. शिलाई मशीन घेऊन ज्या वस्तूंना बाजारात जास्त मागणी आहे, त्या वस्तू बनवायच्या असे ठरले. त्यासाठी शिलाई मशीन आणायच्या कुठून? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र समाजातील काही व्यक्ती चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहतात. मुंबई येथील आनंद मार्ग प्रचारक संघ यांच्याकडून नारी शक्ति महिला औद्योगिक संस्थेला 25 शिलाई मशीन मोफत देण्यात आल्या. या मदतीवर नारी शक्ती संस्थेचे काम जोमात सुरू झाल्याचे शालिनी परदेशी यांनी सांगितले.

गोरगरीब महिलांच्या हाताला मिळाले काम -

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना एकत्र करून ज्या महिलांना शिलाईचे काम येते, त्यांच्याकडून कपड्याच्या वस्तू बनवून घेतल्या. त्यामध्ये परकर, पंजाबी ड्रेस, मास्क तसेच साड्यांना पिको फॉल करणे आदी कामे सुरू झाली. महिलांनी बनवलेले कपडे बाजारात नेऊन विकणारी यंत्रणादेखील (मार्केटिंग) याच महिलांनी निर्माण केली. मग या सगळ्या उद्योगातून येणाऱ्या पैशांमध्ये शिवणकाम करणाऱ्या 50 महिलांना नारीशक्ती संस्थेकडून रोजगार मिळू लागला. सेवाभावी वृत्तीने आजही हे काम मोठ्या जोमात सुरू आहे.

महिलांना मोफत ट्रेनिंग -

बीड शहर व आसपासच्या ज्या महिलांना शिवणकाम शिकण्याची इच्छा आहे. अशा महिलांनादेखील मोफत शिवणकाम शिकवण्याची काम नारी शक्ती महिला संस्था करते. संस्थेची ही सेवाभावी वृत्तीपाहून बीडमध्ये हे फॅशन डिझाइनिंगचे काम करणाऱ्या चार मुलींनी देखील दिवसातून चार तास येथील महिलांना कामाचे मोफत ट्रेनिंग देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या पन्नास कुटुंबांना नारी शक्ति महिला संस्थेने आधार दिला आहे. भविष्यात केवळ नारीशक्ती संस्थेचा कपडे विक्रीचा एक स्वतंत्र मॉल असेल एवढेच आमचे स्वप्न आहे, असे येथील नारीशक्ती संस्थेच्या महिलांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.