बीड - जिल्ह्यात कोरोनाचे नवीन सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी आढळून आले. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 47 वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून एकूण 28 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 22 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बीड जिल्ह्यात आज घडीला 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंगळवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे दोन महिन्यानंतर लोक घराच्या बाहेर पडू लागले आहेत, तर दुसरीकडे बीडमध्ये कोरोना आपले पाय पसरवत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातून २८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 6 नमुने पॉझिटिव्ह आले, तर 22 नमुने निगेटिव्ह आहेत.
अशी आहे बीड जिल्ह्यातील स्थिती -
जिल्ह्यातील परळी तसेच शिरूर तालुक्यातही तरुणाने आपल्या हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. मंगळवारी हाळब ता. परळी, बारगजवाडी ता. शिरूर येथे प्रत्येकी दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कारेगाव ता. पाटोदा आणि वाहली ता. पाटोदा या ठिकाणी कोरोनाचा प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहेत. यामुळे आता माजलगाव 10, बीड 11, पाटोदा 6, शिरूर 2, केज 2, गेवराई 2, वडवणी 4, धारूर 7, आष्टी 1 आणि परळी 2 रूग्ण झाले आहेत. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्ण हे सर्व मुंबईवरून आलेले आहेत.