ETV Bharat / state

बीड सोडून राज्यभर युती चालणार नाही, दानवेंचा मेटेंना टोला - शिवसंग्राम

युती करायची असल्यास राज्यभर होईल. बीड सोडून राज्यभर युती असे चालणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंना टोला लगावला.

रावसाहेब दानवेंचा विनायक मेटेंना टोला
author img

By

Published : Mar 17, 2019, 5:52 PM IST

बीड - युती करायची असल्यास राज्यभर होईल. बीड सोडून राज्यभर युती असे चालणार नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंना टोला लगावला. राज्यभर युती असली तरी बीडमध्ये नाही, असे वक्तव्य विनायक मेटेंनी केले होते.

पंकजा मुंडेंवरील रोष बोलून दाखवत बीडमध्ये शिवसंग्राम भाजपसोबत जाणार नाही, असे विधान विनायक मेटेंनी केले होते. त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंना धनंजय मुंडे आणि विनायक मेटे असा दुहेरी विरोध असल्याचे दिसून आले. मेटेंच्या या विधानावर रावसाहेब दानवे यांनी त्यांना टोला लगावला. राज्यात शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना, जाणकर, आणि मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेने एकत्र निवडणूक लढवली होती. मतांचा विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळेच सेना-भाजप सर्वत्र मेळावे घेत असल्याचे दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवेंचा विनायक मेटेंना टोला

युती करायची असल्यास राज्यभर होईल, त्यांनी फेरविचार करावा. विनायक मेटे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही त्यांना बोलावून यासंदर्भात विचारू आणि पुन्हा एकदा फेरविचार करायला सांगू. हेच अल्टिमेटम आहे, असेही दानवे म्हणाले.

Intro:राज्यभर युती आहे त्यामुळे बीड सोडून राज्यभर युती अस चालणार नाही. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना लगावला.

Body:राज्यभर युती असली तरी बीड मध्ये नाही असं वक्तव्य विनायक मेटे यांनी केलं होतं. पंकजा मुंडे वरील रोष विनायक मेटे यांनी बोलून दाखवत बीड मध्ये शिवसंग्राम भाजप सोबत नाही असं विधान विनायक मेटे यांनी केलं होतं. त्यामुळे बीड मधे पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे आणि विनायक मेटे असा दुहेरी विरोध असल्याचं दिसून आलं.

Conclusion:मेंटेच्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टोला लागवलाय. राज्यात शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना, जाणकर, आणि मेंटेनच्या संघटनेने एकत्र निवडणूक लढवली. मतांचा विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. असा प्रयत्न केला. त्यामुळे सेना - भाजप सर्वत्र मेळावे घेत आहोत. युती करायची असल्यास राज्यभर होईल, त्यांनी फेर विचार करावा. विनायक मेटे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून आम्ही त्यांना बोलावून विचारू पुन्हा एकदा फेरविचार करायला सांगू. हेच अल्टिमेटम आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विनायक मेटे यांनी लावलाय.

byte - रावसाहेब दानवे - प्रदेशाध्यक्ष भाजप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.