ETV Bharat / state

दामदुप्पट रक्कम अन् प्लॉट, फ्लॅटचे आमिष; पुण्याच्या कंपनीकडून ९० लाख रुपयांना गंडा

पुण्याच्या मेरीट लॅन्ड मार्क्स कंपनीने बीडकर ठेवीदारांना तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

beed police
beed policeबीड पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jul 5, 2021, 4:22 PM IST

बीड - ३ वर्षे हप्ते भरल्यानंतर पाचव्या वर्षी दामदुप्पट पैसे किंवा त्या रकमेचा प्लॉट, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या मेरीट लॅन्ड मार्क्स कंपनीने बीडकर ठेवीदारांना तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्ष व संचालकांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्याच्या मेरिट लॅन्ड मार्क्स कंपनीकडून फसवणूक -

मागील काही वर्षांत बीडकरांना विविध कंपन्या, साखळी पद्धतीने गुंतवणूक करणारे ग्रुप आणि ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून काही मल्टिस्टेट बँकांनी कोट्यवधी रुपयांना लुबाडले आहे. त्यात आता पुण्याच्या मेरिट लॅन्ड मार्क्स या कंपनीचीही भर पडली आहे. या कंपनीने बीडमध्ये जालना रोडवर लक्ष्मी संकुलात आपले कार्यालय थाटले होते. १ हजार रुपयांपासून गुंतवणूक करुन ३ वर्षे हप्ते भरा आणि पाचव्या वर्षी दामदुप्पट रक्कम मिळवा किंवा त्याच किमतीचा प्लॉट किंवा फ्लॅट मिळवण्याची योजना या कंपनीने आणली होती. घर, जमीन होईल या आशेने अनेकांनी सन २०१४ ते २०१७ या काळात या कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र, पाच वर्षे होईपर्यंतच कंपनीने कार्यालय बंद करुन बस्तान बांधले. गुंतवणूकदारांना अंधारात ठेवत कंपनीने गाशा गुंडाळला.

पुण्यापर्यंत जाऊन गुंतवणूकदारांनी पाठपुरावा केला. मात्र, दामदुप्पट दूर मुळ रक्कमही परत मिळाली नाही. ८९ लाख ९४ हजार ४०० रुपयांना या कंपनीने गंडा घातला आहे. या प्रकरणी भाऊसाहेब बापूराव गळगटे (रा. हरिनारायण आष्टा ता. आष्टी जि. बीड) यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात मेरिट लॅन्ड मार्क्स कंपनीचा अध्यक्ष महेश प्रकाश मुंगसे, संचालक सुरेश भानुदास जाधव, किरण प्रकाश आटपालकर, महादेव विश्वनाथ साळुंके यांच्या विरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार-

दरम्यान, फसवणूक झालेल्या रकमेचा आकडा मोठा असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला जाणार असल्याची माहिती शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.