परळी - परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकास कामांना गती प्राप्त झाली असून, मतदारसंघातील महत्त्वाचे रस्ते व पुलांच्या दुरुस्ती तसेच बांधकामाच्या सुमारे 24 कोटी रुपयांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एकीकडे कोविड विरुद्धच्या निकराच्या लढाईत सर्व शक्ती पणाला लाऊन लढा देत असताना, दुसरीकडे मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्याकडेही धनंजय मुंडे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचना
त्यांच्या माध्यमातून पोहनेर-सिरसाळा रस्ता रुंदीकरण व लहान पुलांचे बांधकाम करणे यासाठी 7.59 कोटी रुपये, हिंगणी-आमला-कांनापूर-म्हातारगाव-सोनहिवरा रस्ता दुरुस्ती व पुलांचे बांधकाम यासाठी 5.22 कोटी, देवळा-धानोरा-मूडेगाव-सुगाव-नांदगाव-बरदापूर-हातोला-तळेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 4.92 कोटी रुपये, उजनी-निरपना पुलांचे बांधकाम 2.54 कोटी रुपये, पोहनेर-सिरसाळा-मोहा-गर्देवाडी राज्य मार्ग रुंदीकरण काँक्रीटीकरण व रस्ता दुभाजकासह सुधारणा करण्यासाठी 1.73 कोटी रुपये, जोडवाडी-धसवाडीमध्ये लहान पुलांच्या बांधकामासाठी 98 लाख रुपये व 94 लाख रुपये असे एकूण सुमारे 24 कोटी अंदाजित रकमेच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान सदर निविदा प्रक्रिया तातडीने राबवून सर्व रस्त्यांचे बांधकाम दर्जेदार व्हावे, यासाठी धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक याचा पूरावा नाही - रणदीप गुलेरिया