बीड : जग एकीकडे आधुनिकतेकडे चाललेलं असताना, दुसरीकडे मात्र पारंपारिक व्यवसाय मोडकळीस निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून पाहतो की, समाजामध्ये राहणारे बारा बोलतेदारांचे व्यवसाय मोडकळीस निघाले आहेत. त्याच्यामध्ये कुंभार, लोहार, सुतार, चर्मकार, नाव्ही, घिसाडी, हा समाज व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतो. त्यामध्ये कुंभार समाज (Potter community) यांच्या व्यवसायाला लागणार साहित्य पूर्वी फुकट मिळायचं आता ते विकत घ्यावा लागतं. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात घट होत चालली आहे आणि हा व्यवसाय पुढे चालून काही दिवसात मोडकळीस येतोय की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आणि या समाजातील व्यवसाय करणाऱ्या लोकांनी जगावं कसं आमचं जगणंच मुश्किल झाले असंच या निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (appeals to government for help )
व्यवसायासाठी सरकारकडे जागेची मागणी : या मातीमध्ये 50 ते 60 खन तयार होतात एक दिवस माती मुरवायला लागतात एक दिवस सोडवायला लागतात, 50 खनाची माती तयार करायला दोन दिवस लागतात, साधारण तुम्ही मजुरी करायला गेले तर पाचशे ते सहाशे रुपये रोज पडतो,आज हे 50 खन जर मार्केटला नेले तर ग्राहक मागते 50 ला द्या 40 ला द्या, माती फुकट होती त्यावेळेस आम्हाला द्यायला परवडत होतं आता माती विकत घ्यावी लागते तर दीड ब्रास ची गाडी जर घेतली तर 16 हजार रुपयाला पडते आणि 1 ब्रास जर घेतली तर 10 हजार रुपयाला पडते, रहदारी वाढली आहे याच्यामध्ये खूप कष्ट आहेत, याच्यामध्ये लीद आणली लीद कालवून टाकली, यापासून खन तयार होतो, दगडी पुल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत सर्व लोकांनी अतिक्रमण केले आहे, नदीचे पात्र पहिलं मोठं होतं रुंदीकरण केल्यानंतरही लोकांनी भर टाकून त्याच्यावर शेड मारले आहेत, नदीमध्ये कब्जा केले आहे आता आम्हाला आमचा व्यवसाय करण्यासाठी जागा राहिली नाही, आताही आम्हाला जागा पुरत नाही आता आमची अशी मागणी आहे की आम्हाला कुठेतरी गायरानामध्ये किंवा कुठेतरी व्यवसायासाठी जागा नगरपालिकेने किंवा जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार यांनी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गणेश चित्रे यांनी केली आहे. (Beed Potter News)
मालाला याेग्य भाव मिळावा : दरम्यान, विजया चित्रे म्हणाल्या की, आमची परिस्थिती फार बिकट आहे आठ ते दहा हजार रुपयाला आम्हाला मातीचा टेम्पो घ्यावा लागतो. घोड्याची लीद घ्यायला गेलं तर शेतकरी त्याठिकाणी येऊ देत नाही. लिदीचाचा प्रश्न आहे मालाला भाव नाही, हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण हा आमचा पिढीचा धंदा आहे तो आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत. संक्रांतीच्या सणाचे काम चालू आहे. संंक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना बारा ते तेरा वस्तू खानामध्ये द्यावे लागतात. आम्हाला हा माल विकल्याशिवाय पर्याय नसतो. कारण पैसा गुंतवून पडलेला आहे, दुसरी गोष्ट म्हणजे हा माल जर विकला नाही तर वर्षभर हा माल पडून राहतो. त्यामुळे माल विकणे गरजेचे आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की, आमच्या मालाला योग्य भाव मिळावा व आमच्या कष्टाचं मोल व्हावं अशी मागणी विजया चित्रे यांनी केली आहे. (Beed Potter News)
शासनाकडे मदतीची हाक : तर दुसरीकडे संतोष चित्रे म्हणाले की, सध्या खण तयार करण्याचे काम चालू आहे आणि खन तयार करण्यासाठी आम्हाला माती विकत घ्यावी लागते, माती विकत घेतल्यामुळे आम्हाला धंद्यामध्ये नफा कमी राहत आहे. पूर्वी माती फुकट होती आता माती विकत घेऊन काम करावा लागत आहे. मातीची एक ट्रक आम्हाला बारा ते तेरा हजार रुपयाला पडत आहे. त्याच्यामध्ये आमचे तीस ते पस्तीस हजार रुपयांचे काम होते. त्यात आमची मजुरी निघत नाही आणि मेहनतीचेही पैसे निघत नाहीत. त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला काही मदत करावी अशी मागणी संतोष चित्रे यांनी केली आहे.