ETV Bharat / state

मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन; परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना - santosh karad passed away

मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ४८ वर्षे वयाचे होते.

मुख्याध्यापक संतोष कराड यांचं निधन
मुख्याध्यापक संतोष कराड यांचं निधन
author img

By

Published : May 25, 2021, 7:18 PM IST

बीड - परळी शहरात विविध उपक्रमांतर्गत हिरिरिने भाग घेत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे सर्व परिचित मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ४८ वर्षे वयाचे होते. त्यांच्या निधनाने परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना व्यक्त होत आहेत.

संतोष कराड हे गेल्या अनेक वर्षांपासून परळीत शिक्षक म्हणून सेवेत होते. मूळचे चोपनवाडी येथील संतोष कराड हे परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील पांडुरंग विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. परळी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.

जेष्ठ नेते बाबुराव मुंडे यांचे ते जावई होत

परळीतील शैक्षणिक सर्व उपक्रमात ते नेहमी सक्रिय सहभागी असायचे. विविध शिबिरे, क्रीडा स्पर्धा, विविध संस्था, संघटना आयोजित शिक्षणविषयक उपक्रमांत त्यांनी हिरिरिने सहभाग घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांचे ते जावई होत. मुख्याध्यापक संतोष कराड यांच्या निधनाबद्दल परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात शोकभावना व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.