ETV Bharat / state

अंबाजोगाईत ऑनलाइन आयपीएल सट्टेबाजीवर छापा; चार जण अटकेत - IPL betting

आयपीएलमध्ये काल (मंगळवारी) दिल्ली कॅपीटल विरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळूरु असा सामना पार पडला. या दरम्यान अंबाजोगाई शहरातील कुत्तर विहीर परिसरातील तानाजी मालुसरे चौकात काही सट्टेबाज या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकास मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर जायभाये यांच्या विशेष पथकाने रात्री ८.३० वाजता या ठिकाणी छापा मारला.

आरोपी अटकेत
आरोपी अटकेत
author img

By

Published : Apr 28, 2021, 4:50 PM IST

अंबाजोगाई (बीड) - सध्या एकीकडे कोरोनाचा उद्रेक झालेला असताना दुसरीकडे आयपीएल सामन्यांचा सर्वत्र धुमधडाका सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन सट्टेबाजी देखील जोरात चालू आहे. अंबाजोगाईत सुरु असलेल्या आयपीएल सट्टेबाजीवर छापा मारून चार सट्टेबाजांना रंगेहाथ पकडले तर सात जण पसार झाले. यावेळी पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमालही जप्त केला.

आयपीएलमध्ये काल (मंगळवारी) दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू असा सामना पार पडला. या दरम्यान अंबाजोगाई शहरातील कुत्तर विहीर परिसरातील तानाजी मालुसरे चौकात काही सट्टेबाज या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकास मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर जायभाये यांच्या विशेष पथकाने रात्री ८.३० वाजता या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहून ११ सट्टेबाज मोबाईल, लॅपटॉप प्रिन्टर, एलईडी या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या माध्यमाद्वारे सट्टा खेळत आणि खेळवत असताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शिताफीने गोपाळराव नारायणराव धायगुडे, लक्ष्मीकांत गोपाळराव धायगुडे, शुभम गोपाळराव धायगुडे आणि संदिप गोपाळराव गायकवाड या सट्टेबाजांना ताब्यात घेतले. मात्र, मनोज कालिया, निलेश डिडवाणी, सुरेश सोमाणी, श्रीकांत उर्फ गोट्या गोपाळराव धायगुडे, नयन कदम, अभिषेक कदम आणि बबलू कातळे हे सट्टेबाज पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून मोबाइल लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण ७५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कसबे यांच्या फिर्यादीवरून सर्व ११ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक स्वाती भोर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.