ETV Bharat / state

बीड : लग्नाचे आमिष दाखवून आठवीच्या विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार - beed police

लग्नाचे आमिष दाखवून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार परळीत उघडकीस आला आहे.

beed rape news
बीड : लग्नाचे आमिष दाखवून आठवीच्या विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार
author img

By

Published : Sep 25, 2020, 6:32 AM IST

Updated : Sep 25, 2020, 6:47 AM IST

बीड - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात तरुणावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. पीडित मुलगी 14 वर्षांची आहे.

तक्रारीनुसार, संबंधित पीडित मुलगी मुळची परळीतील असून आई-वडिलांचे भांडण झाल्याने सात वर्षांपासून आई आणि भावासह आजोळी राहते. या दरम्यान तिची ओळख बालाजी विष्णू दहिफळे या तरुणासोबत झाली. सतत भेटीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि बालाजीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. 15 जून रोजी दुपारी पीडिता मैत्रिणीला भेटून घराकडे निघाल्यानंतर वाटेत तिला बालाजी भेटला आणि तिला स्वतःच्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेला. या ठिकाणी पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यात आले.

त्यानंतर प्रत्येक भेटीत बालाजीने झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला काहीच सांगायचे नाही, असे पीडितेला बजावले. 15 ऑगस्ट रोजी दुपारी बालाजीने पुन्हा पीडितेवर त्याच्या झेरॉक्सच्या खोलीत अत्याचार केला.

दरम्यान, मंगळवारी (22 सप्टेंबर) रोजी पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला आईने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बालाजी विष्णू दहिफळे विरोधात गुरुवारी परळी ग्रामीण ठाण्यात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिरगे करत आहेत.

Last Updated : Sep 25, 2020, 6:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.