ETV Bharat / state

जयदत्त क्षीरसागरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ - शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.

जयदत्त क्षीरसागरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
author img

By

Published : Jun 16, 2019, 11:18 PM IST

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. क्षीरसागर यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.

जयदत्त क्षीरसागरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

रविवारी शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या मंत्रीपदामुळे जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विकासाचा 'बॅकलॉग' भरून काढण्याची नामी संधी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते म्हणून विशेषतः जयदत्त क्षीरसागर यांची मराठवाड्याला ओळख आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुखावलेले जयदत्त क्षीरसागर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली. त्यामुळे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन मंत्रिमंडळात संधी दिली आहे.

Intro:खालील बातमीमध्ये आरोग्य मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो वापरावा...
********************

तब्बल बारा वर्षानंतर मराठवाड्याला जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने मिळाले आरोग्य मंत्री पद

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याकडे आरोग्य मंत्रीपदाचा पदभार दिलेला आहे. यापूर्वी स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या माध्यमातून चार वर्ष चार महिने म्हणजेच 2008 पर्यंत बीड जिल्ह्याकडे आरोग्य मंत्री पद होते. रविवारी शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तब्बल बारा वर्षानंतर बीड जिल्ह्याकडेच नव्हे तर मराठवाड्याला आरोग्यमंत्री (कॅबिनेट) हे पद मिळाले आहे. 12 वर्षापासून जिल्ह्यतील व मराठवाड्यातील आरोग्य विभागाच्या विकासाचा 'बॅकलॉग' भरून काढण्याची नामी संधी आरोग्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहे. प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते म्हणून विशेषतः जयदत्त क्षीरसागर यांची मराठवाड्याला ओळख आहे.

Body:राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचे नुकतेच आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून दुखावलेले जयदत्त क्षीरसागर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या बहिण खा. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन मंत्रिमंडळात संधी दिली. खऱ्या अर्थाने मराठवाड्याला बारा वर्षानंतर (2008 नंतर) आरोग्य मंत्री पद मिळाले आहे. यादरम्यान अनेक आरोग्याचे प्रश्न कायम राहिलेले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याची नामी संधी जयदत्त क्षीरसागर यांना मिळाली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड येथील 100 खाटांचे माता व बाल रुग्णालय रखडलेले आहे. या 100 खाटा च्या रुग्णालयाला गती मिळू शकते. याशिवाय दोनशे खाटांच्या इमारतीचे काम बजेट अभावी मार्गी लागलेले नाही. बीड जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीतील ऑपरेशन थेटर ड्रेनेज नसल्याने धोकादायक बनले आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड , उस्मानाबाद व लातूर येथील आरोग्याच्या विकासासाठी विशेष उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी रुग्णालयाच्या इमारतीला मंजूरी आहे मात्र प्रत्यक्षात बजेट अभावी इमारतींची कामे सुरू नाहीत. उस्मानाबाद, लातूर , बीड या ठिकाणी जुनी लोकसंख्या गृहीत धरून खाटांची संख्या आहे. खाटांच्या संख्येत वाढ करून गोरगरीब रुग्णांपर्यंत मूलभूत आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याची नितांत गरज आहे.

Conclusion:याशिवाय बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण बीड जिल्ह्यात मजुरांची मोठी संख्या आहे. याशिवाय ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील बीडची ओळख आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा गोरगरिबाला परवडणारी व सक्षम असणे आवश्यक आहे. यामध्ये बीड तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अनेक वर्षापासून धूळ खात पडून आहे. माजलगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम रखडलेले आहे. बीड जिल्ह्यात केवळ दोनच स्त्री रुग्णालय आहेत. यामध्ये शहरी भागात बीडला एक स्त्री रुग्णालय उभारले जाऊ शकते. अंबाजोगाई येथील स्त्री व मानसिक आरोग्य रुग्णालय याला स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या काळात मंजुरी मिळाली होती. ती तेथील या रुग्णालयाची इमारत बांधून सज्ज आहे. आठ दिवसापूर्वी पद भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे आरोग्य सेवा व पदभरतीला गती मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याशिवाय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा कळीचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. कर्मचारी मोठ्या अपेक्षेने लढा देत आहेत. या सगळ्या बाबी कमी कालावधीत मार्गी लावण्याचे मोठे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर आहे. या सगळ्या प्रश्नांना अवघ्या तीन ते चार महिन्यात गती द्यावी लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.