ETV Bharat / state

Hanuman Mandir Beed: मराठवाड्यातील सर्वात उंच हनुमान.. नायगाव अभयारण्यातील 41 फूट हनुमानाची सर्वदूर ख्याती - हनुमानाची ख्याती

बीडच्या पाटोदा तालुक्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मयूर नायगाव अभयारण्यामध्ये हनुमानाची 41 फुटाची मूर्ती पाहायला मिळते. हे हनुमान नवसाला पावणारे आहे. त्यामुळे भाविक भक्त या ठिकाणी पौर्णिमा, शनिवार या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचबरोबर अनेक लोक या ठिकाणी व्यसनमुक्त सुद्धा झालेले आहेत. तर काय आहे या 41 फूट हनुमानाची ख्याती या विषयीचा स्पेशल रिपोर्ट.

Hanuman Mandir Beed
41 फूट हनुमानाची सर्वदूर ख्याती
author img

By

Published : Mar 1, 2023, 10:48 AM IST

41 फूट हनुमानाची ख्याती

बीड: हनुमान टेकडी या ठिकाणी पूर्वीच्याकाळी वैतागवाडी नावाचे गाव होते. हे ठिकाण बीड नगर रस्त्यावर आहे. ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगतात की, मनामध्ये संकल्प केला होता, निवांत व शांत ठिकाणी आपली भक्ती करण्यासाठी मी या ठिकाणी राहिलो. चाकरवाडी येथील ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते 29 मार्च 1998 ला हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी अन्नदान केले जाते ते कार्य अजूनही चालूच आहे. बीड जिल्ह्यामध्ये गोरक्षनाथ टेकडी आहे. तशी या ठिकाणी हनुमान टेकडी म्हणून ही प्रसिद्ध आहे. त्याच्या मनामध्ये संकल्प आला की, आपण हनुमानाची सर्वात मोठी मूर्ती या ठिकाणी स्थापन करावी. बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमानजी आणि पवनसुत असणारे हनुमान या श्लोकाप्रमाणे आहेत.

हनुमानची 41 फुटाची मूर्ती : हनुमानाची मोठी मूर्ती स्थापन करावी मनामध्ये संकल्प होता. वारकरी संप्रदायमध्ये फिरत असताना, अनेक ठिकाणी ते फिरले आणि अनेक ठिकाणी फिरत असताना अशी मोठी मूर्ती मराठवाड्यामध्ये कुठेही नाही हे त्यांना समजले. हनुमानची 41 फुटाची मूर्ती बनवली आहे. दोन मूर्तिकार मिस्त्रीनी मूर्ती बनवली आहे. त्यांना तब्बल एक वर्ष ही मूर्ती बनवण्यासाठी लागला आहे. अत्यंत आकर्षक आणि मराठवाड्यामध्ये कुठेही नसलेली अशी मूर्ती हनुमान टेकडी तयार केली. हे कारागीर एमपी मधील होते. महाराष्ट्रामध्ये आपले नाव व्हावे याच्यासाठी त्या कारागिरांनी या मूर्तीला प्राण पणाला लावून काम केले होते. या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला व शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ज्याच्या मनामध्ये हनुमानाविषयी प्रेम आहे, अशी मंडळी या ठिकाणी ही मूर्ती पाहिल्यानंतर पुढे न जाता चक्क सेल्फीही घेतात. ब्रह्म मुहूर्तावर सकाळी हनुमान जन्म महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या परिसरातील लोक मोठ्या मनोभावे या हनुमानच्या दर्शनासाठी येतात.

अभयारण्य महाराष्ट्रभर प्रसिद्ध: शिवाजी महाराज येवले यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र हनुमान टेकडी हे नायगाव मयूर अभयारण्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या मोरांसाठी शासनाने ठेवलेले हे पूर्ण अभयारण्य आहे. हे ठिकाण मयूर अभयारण्याच्या ठिकाणी असल्यामुळे याला फार शोभा आलेली आहे. या आश्रमाचा परिसर फार मोठा असून ही मूर्ती बीड नगर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आहे. महाराजांची इच्छा होती की, आपण तीर्थयात्रा करत असताना हनुमानाची भव्य अशी मूर्ती या ठिकाणी उभी करावी. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी ही मूर्ती उभी केली आहे. हनुमानजी ने त्यांना बुद्धी दिली आणि त्यांनी ही मूर्ती या ठिकाणी स्थापन केली असे त्यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठी लोक येतात: संपूर्ण महाराष्ट्रभर नवसाला पावणारी हनुमानची मूर्ती म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. या ठिकाणी जी तरुण मंडळी आहे ती व्यसनमुक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी येत आहे. अध्यात्माचा आनंद घेण्याकरिता आणि हनुमानाची भक्ती करण्याकरिता येतात. आजच्या जर आपण तरुणांचा विचार केला तर, आजचे तरुण व्यसन आणि फॅशनमध्ये गुंतले आहेत. व्यसन आणि फॅशन हे अधोगतीला नेणारे मार्ग आहेत. जन्मामध्ये येऊन काहीतरी केल पाहिजे आणि जन्माला येऊन भगवंतप्राप्ती झाली पाहिजे. हनुमानाची भक्ती करावी हे करण्यासाठी व्यसन आणि फॅशन यापासून दूर राहिले पाहिजे.

मनाला समाधान वाटते: संतोष येवले या भाविकांनी सांगितले की, मी जालना जिल्ह्यातील रहिवासी असून आळंदीला जात असताना या ठिकाणी मी मुक्कामी थांबलो आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रामध्ये सुंदर मूर्ती कुठेही पाहायला मिळत नाही. हे हनुमान नवसाला पावणारे आहेत. ही मूर्ती पाहून मनाला समाधान वाटते. त्याचबरोबर या ठिकाणी घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये ही मूर्ती असल्याने मनाला फार मोहक वाटत आहे, या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि अनेक लोक व्यसनमुक्त सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत.

हेही वाचा: Bada Hanuman Mandir Beed बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान जाणून घ्या काय आहे ख्याती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.