ETV Bharat / state

ऊसतोड मजुरांचा नव्हे, शेतकरी आत्महत्येचा जिल्हा; बीडमध्ये प्रत्येक 12 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे बीड जिल्ह्यात जानेवारी 2020 ते 26 जून 2020 या सहा महिन्यात 82 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. दिवसेंदिवस बळीराजाच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत.

Beed
जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Jun 26, 2020, 8:53 PM IST

Updated : Jun 26, 2020, 9:40 PM IST

बीड - कधी शासनाच्या धोरणाचा तर कधी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वात आधी बसतो तो शेतकऱ्यांना... सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे बीड जिल्ह्यात जानेवारी 2020 ते 26 जून 2020 या सहा महिन्यात 82 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. बीड जिल्ह्यात चक्क प्रत्येक बारा तासात एक आत्महत्या होत असल्याचे शासनाच्या शेतकरी आत्महत्या अहवालात समोर आले आहे. बळीराजाच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

ऊसतोड मजुरांचा नव्हे, शेतकरी आत्महत्येचा जिल्हा; बीडमध्ये प्रत्येक 12 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. दिवसेंदिवस बळीराजाच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे यामधून येणाऱ्या निराशेपोटी शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल उचलतो. बीड जिल्ह्यात मागील सहा महिन्यात एकूण 82 शेतकऱ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले आहे. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत.

अशी आहे महिना निहाय आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या

जानेवारी 2020-18

फेब्रुवारी -16

मार्च -19

एप्रिल - 9

मे- 8 जून- 12

अशाप्रकारे बीड जिल्ह्यात मागील सहा महिन्यात 82 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला शासन एक लाख रुपयांची तुटपुंजी मदत देते. बीड जिल्ह्यात अनेक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत.

तरुण शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले

तरुण शेतकर्‍यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. याला थांबवण्यासाठी शासनाकडून विशेष उपाय योजना राबविण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे म्हणाले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत अशी मागणी मागील अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अमर हबीब यांनी केलेली आहे. मात्र हे सरकार शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी विलंब करत आहे. याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर देखील होत आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी असलेले कायदे रद्द करण्याची मागणी अमर हबीब यांच्यासह महाराष्ट्रभरातून केली जाते.

Last Updated : Jun 26, 2020, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.