ETV Bharat / state

आष्टी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी - Beed District Latest News

आष्टी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत ही आरोग्य तपासणी करण्यात आली. दिवसभरात जवळपास साठ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिली आहे.

आष्टीत पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
आष्टी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
author img

By

Published : Mar 7, 2021, 2:43 AM IST

आष्टी (बीड) आष्टी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत ही आरोग्य तपासणी करण्यात आली. दिवसभरात जवळपास साठ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिली आहे.

सकाळी दहा ते सायंकाळी 5 या कालावधीत तपासणी

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशाने गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी सकाळी दहा ते सांयकाळी 5 या कालावधीत पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत कर्मचाऱ्यांचा रक्तदाब व साखरचे प्रमाण यांची तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डाॅ. सचिन पाळवदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक नागेश करांडे, श्रीमती विद्या घुगे हे सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.