ETV Bharat / state

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अभियंत्याला चोवीस लाखांचा गंडा, गुन्हा दाखल - Beed Latest News

सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टिप्स देण्याचे आमिष दाखवून, आणि नंतर ट्रेडिंगमध्ये झालेला नफा जमा करण्याच्या बहाण्याने आरोपींनी बीड शहरातील एका सिव्हील इंजिनिअरला २४ लाख २९ हजार ८३४ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली अभियंत्याला चोवीस लाखांचा गंडा

author img

By

Published : Mar 7, 2021, 12:01 AM IST

बीड - सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टिप्स देण्याचे आमिष दाखवून, आणि नंतर ट्रेडिंगमध्ये झालेला नफा जमा करण्याच्या बहाण्याने आरोपींनी बीड शहरातील एका सिव्हील इंजिनिअरला २४ लाख २९ हजार ८३४ रुपयांचा गंडा घातला आहे. २१ जानेवारी रोजी सुरू झालेला फसवणुकीचा हा प्रकार तब्बल दीड महिना सुरू होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयसिंह प्रकाशराव जगताप (रा. दत्तनगर, बीड) असे या फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी रात्री ८ वजता त्यांच्या मोबाईलवर झारखंड येथील जे.एस. ट्रेडस यांच्याकडून कॉल आला, आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळविण्यासाठी त्यांच्या टिप्सचा उपयोग करण्यासाठी सांगण्यात आले. आरोपींच्या सततच्या पाठपुराव्यानंतर उदयसिंह जगताप यांनी साडेबारा हजार रु. भरून या कंपनीचे सदस्यत्व मिळवले.

अशी झाली फसवणूक

दरम्यान त्यानंतर जगताप यांनी या कंपनीवर विश्वास ठेऊन लाखो रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले. सुरुवातीला चांगला नफा मिळाल्याने जगताप यांचा त्या कंपनीवर अधिक विश्वास बसला, आणि त्यांनी गुंतवणूक वाढवली. दरम्यान जगताप यांना मोठा नफा झाल्याचे दाखवून तो क्लेम करण्यासाठी पैसे भरावे लागतील असं आरोपींनी त्यांना सांगितले. जगताप यांनी या कंपनीकडे एकूण 24 लाख 29 हजार 834 रुपये जमा केले. मात्र पुन्हा एकदा आरोपींचा जगताप यांना फोन आला, आणि त्यांनी सॉप्टवेअर चार्जेसच्या नावाखाली आणखी सव्वापाच लाख रुपये जगताप यांना जमा करायला सांगितले. त्यामुळे जगताप यांना संशय आल्याने, त्यांनी या कंपनीबाबत अधिक माहिती घेतली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आहे. त्यांनी याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जगताप यांच्या तक्रारीच्या आधारे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.