ETV Bharat / state

'मुलगा होत नाही' म्हणून डॉक्टरकडून पत्नीसह तीन महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाण - बीड मुलगी वाचवा न्यूज

'मुलगा का होत नाही' म्हणून डॉक्टरने पत्नीसह तीन महिन्याच्या तान्ह्या मुलीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 'माझा पती माझ्या तीन महिन्यांच्या मुलीला मारून टाकेल. रात्री घरातून पळ काढला म्हणून मी वाचले. माझी लहान मुलगी तिथेच आहे,' असे पीडिता म्हणत आहे. एकंदरीतच या घटनेमुळे मुली अजूनही नकोशा आहेत, अशी स्थिती असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

बीड लेटेस्ट क्राईम न्यूज
बीड लेटेस्ट क्राईम न्यूज
author img

By

Published : Jan 23, 2021, 7:05 PM IST

बीड - 'तू मुलाला जन्म देऊ शकत नाहीस का? सतत तुला मुलीच कशा होतात,' असे म्हणत एका मलेरिया डॉक्टरनेच पत्नीचा अमानुष छळ केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सारोळा येथे घडली आहे. धक्कादायक म्हणजे त्यात महिलेसह तीन महिन्यांच्या तिच्या मुलीलादेखील अमानुष मारहाण करत पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न त्या डॉक्टरने केला असल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे.

'मुलगा होत नाही' म्हणून डॉक्टरकडून पत्नीसह तीन महिन्याच्या मुलीला अमानुष मारहाण

हेही वाचा - गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी 105 वाहनांचे परवाने निलंबित

याबाबत सविस्तर माहिती अशी

केज तालुक्यातील सारोळा येथील प्रियंका ढाकणेचा कळंब येथील येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपल्या पत्नीसह दोन मुलींना बरोबर घेऊन विशाल उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे राहत होता. विशाल हा मलेरिया डॉक्टर आहे. लग्नानंतर पहिली मुलगी झाली व दुसरीही मुलगीच झाली. त्यानंतर प्रियंका हिचा नवऱ्याकडून व त्याच्या कुटुंबीयांकडून छळ होऊ लागला. अक्षरशः प्रियंकाला वेळेवर जेवण देखील दिले जात नव्हते. शुक्रवारी रात्री येते प्रियंकाला तिच्या पतीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिच्या तीन महिन्याच्या मुलीला देखील अमानुष मारले असल्याचा प्रियंकाचा आरोप आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पतीकडून जाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काडीपेटी भिजल्या मुळे दुसरी शोधेपर्यंत घरातून पळ काढत प्रियंकाने कळंबचे बस स्टँड गाठले व थेट बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सारोळा येथे माहेरी पळून आली. पळून आल्यामुळेच माझा जीव वाचला अशी धक्कादायक आपबिती..पीडित प्रियांका घुगे या पीडितेने सांगितली. तिच्या वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून माझ्या तीन महिनीच्या मुलीला वाचवा असा आक्रोश पीडिता करत आहे.

माझ्या तीन महिन्याच्या मुलीला वाचवा - पीडित मातेचा आक्रोश

'माझा पती माझ्या तीन महिन्यांच्या मुलीला मारून टाकेल. रात्री घरातून पळ काढला म्हणून मी वाचले. माझी लहान मुलगी तिथेच आहे,' असेही पीडिता म्हणत आहे. एकंदरीतच या घटनेमुळे मुली अजूनही नकोशा आहेत, अशी स्थिती असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा - मेळघाट : मुलींच्या शासकीय वसतीगृहात बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.