बीड - रागाच्या भरात जन्मदात्या बापालाच मुलाने गोळी घातल्याची घटना आष्टी येथे घडली होती. आज आरोपी मुलगा किरण लटपटे यास आष्टी येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदडांधिकारी के.के. माने यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीला सुनावली तीन दिवसांची कोठडी
आष्टी शहरातील लिमटाका गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या माजी सैनिक संतोष लटपटे हे आपल्या पत्नीला सतत मारहाण करत होते. गुरूवार दि. 20 रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दारूच्या नशेत आपल्या पत्नीवर बंदूक धरत आता तुला मारुन टाकतो, अशी धमकी दिली. यावेळी रागाच्या भरात 24 वर्षीय मुलगा किरण लटपटे याने आपल्या वडिलांना धक्का मारला असता फौजी संतोष यांच्या हातातील बंदूक खाली पडली आणि ती मुलाने उचलली. सुरुवातीला एक गोळी मारली, मात्र ती हुकली आणि दुसरी गोळी थेट संतोष यांच्या पोटात लागली. यामुळे मुलगा किरण याला पोलिसांनी अटक करून बंदूकही जप्त केली आहे. आज शुक्रवार दि. 21 रोजी दुपारी पोलिसांनी आरोपी किरण यास आष्टी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता किरण यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बंदूकीचा होता अधिकृत परवाना
आष्टी मुर्शदपूर भागातील राहणारे संतोष लटपटे हे 1 मे, 2021 रोजी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्याकडे बंदूकीचा अधिकृत परवाना असल्याने ते ती बंदूक स्वत:कडे बाळगत होते.
हेही वाचा - ...म्हणून मुलाने स्वतःच्या बापावर झाडल्या गोळ्या
हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा - गोंदियात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; एकाचा मृत्यू