ETV Bharat / state

स्व. गोपीनाथ मुंडेंच्या व्यक्तिमत्त्वाशी माझी तुलना होऊ शकत नाही - धनंजय मुंडे - beed dhananjay munde news

आपल्या जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण करण्याकरिता धनंजय मुंडे हे नाथ्रा येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात मुंडे यांचे स्वागत केले. या सत्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी स्व. गोपीनाथ मुंडेंच्या व्यक्तिमत्त्वाशी माझी तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

can  not compare with Gopinath Mundes personality with me said Gopinath Munde in beed
स्व. गोपीनाथ मुंडेंच्या व्यक्तिमत्त्वाशी माझी तुलना होऊ शकत नाही - गोपीनाथ मुंडे
author img

By

Published : Feb 7, 2021, 3:40 PM IST

परळी (बीड) - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी नाथऱ्याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील पन्नास वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथ्रा येथे बोलताना काढले. आपल्या जन्मगाव नाथ्रा येथे पूर्ण करण्यात आलेल्या २.३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुंडे हे नाथ्रा येथे आले असता, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात मुंडे यांचे स्वागत केले. या सत्काराला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

गावकऱ्यांनी केले मुंडेंचे स्वागत -

जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता. संपूर्ण गाव अगदी दिवाळी प्रमाणे सजलेले, रोषणाई व फटाक्यांच्या अतिषबाजीने नटलेले दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढत महिलांनी घरोघरी मुंडेंचे औक्षण करत ओवाळणी केली. त्यानंतर तब्बल एक टन वजनाचा हार घालून नाथरेकरांनी आपल्या भूमीपुत्राचे अविस्मरणीय असे स्वागत केले.

विविध विकासकामांचे केले लोकार्पण -

नाथ्रा येथे पांढरी १.२५ कोटी रुपये खर्चून उभारलेला उच्चालक बंधारा, वार्ड क्रमांक एकमधील ३० लाखांचे रस्ते व नाल्या, २० लाखांचे स्मशान भूमी कंपाउंड, १० लक्ष रुपये खर्चून उभारलेला स्व. पंडित अण्णा मुंडे प्रवासी निवारा, १० लाखांचे वाचनालय, २० लाखांचे जिल्हा परिषद शाळेतील कंपाउंड व पेव्हर ब्लॉक, दोन्ही अंगणवाड्यांमधील मिळून १० लाखांचे पेव्हर ब्लॉक तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यातील ५ लाखांचे पेव्हर ब्लॉक आदी कामांचे मुंडेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

धनंजय मुंडे रमले बालपणाच्या आठवणीत -

मी मंत्री पदापर्यंत पोहचेन, असे कधीही वाटले नव्हते. खरंतर आमच्या कुटुंबाचे स्वप्न हे स्व. गोपीनाथराव मुंडे राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहण्याचे होते. असे सांगताना धनंजय मुंडे बालपणीच्या आठवणीत हरवले. लहानपणी विहिरींमध्ये, नदीमध्ये पोहायला जाणे, हाती बत्ती घेऊन मासे पकडण्यासाठी रात्रभर जागणे, याबाबरोबरच आपले दोन्ही चुलते स्व. माणिकराव मुंडे व स्व. व्यंकटराव मुंडे यांच्या सोबतच्या आठवणी सांगताना धनंजय मुंडे यांना गहिवरून आले.

आमदार झालो तेंव्हा गावाला आनंद झाला -

माझ्या आयुष्यात अविरत संघर्ष वाट्याला आला. २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत कोणतेही पद सहज मिळाले नाही. आमदारकीसाठी २००९ ते २०१९ असे तब्बल दहा वर्षे वाट पाहावी लागली. लोकांची कामे करण्यात वर्षे कशी निघून गेली कळले नाही. पण २०१९ मध्ये जेव्हा मी विधानसभेला निवडून आलो, तेव्हा माझ्या आईला जितका आनंद झाला होता, तितकाच आनंद माझ्या संपूर्ण गावाला झाला होता, हे सांगताना धनंजय मुंडे यांचे डोळे भरून आले होते.

'त्यांच्या' व्यक्तिमत्वाशी माझी बरोबरी होऊ शकत नाही -

अनेकदा लोक मला म्हणतात की माझ्या कामातून, वागण्यातून अनेकांना स्व. पंडित अण्णा व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भास होतो; पण खरंतर मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळपाससुद्धा नाही. स्व. अण्णांनी केलेली लोकसेवा, या भागातील लोकांना दिलेले प्रेम व स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राजकारण व समाजकारणातून विकासाची राबवलेली दूरदृष्टी याचा अवलंब करून मी त्यांच्याप्रमाणेच या भागातील व गावातील लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहिन, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

लवकरच शिवपार्वती साखर कारखाना सुरू होणार -

गेल्या एक-दोन वर्षात या भागात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन वाढले आहे. या भागातील ऊसाचे पूर्ण गाळप व्हावे, यासाठी पुढील सीझनपासून मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखाना सुरू होणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी आपल्या जन्मगावातून केली.

तर इथेच जन्म घेईन -

मुंडे या नावाचा राज्यात आणि देशात दबदबा आहे. पण, या नावाला शोभेल असे काम गावासाठी आजवर करता आले नाही. गावाने नाव दिले, ओळख दिली, प्रेम दिले, विश्वास दिला, कोणतेही संकट आले तरीही लोकांच्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही काम मी कदापि करणार नाही. हा विश्वास देताना पुनर्जन्म जर खरंच होत असेल, तर पुन्हा याच गावाच्या मातीतच जन्म घेईन, असे धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरातल्या 'ओपन फ्रीज'मुळे मिटतेय अनेकांची भूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.