मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या बसला आग लागली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघाताचे काही फोटो, व्हिडिओही समोर आले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप बसमधून काढण्यात आले आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
-
BEST bus catches fire in Mumbai's Bandra area; all passengers safe pic.twitter.com/HuPm8Qm9bG
— ANI (@ANI) January 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BEST bus catches fire in Mumbai's Bandra area; all passengers safe pic.twitter.com/HuPm8Qm9bG
— ANI (@ANI) January 25, 2023BEST bus catches fire in Mumbai's Bandra area; all passengers safe pic.twitter.com/HuPm8Qm9bG
— ANI (@ANI) January 25, 2023
बेस्टमधून धुराचे लोट : आग धुराचे लोट पाहून बेस्टच्या चालकाने तात्काळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. आगीची घटना घडली तेव्हा बसमध्ये २० जण प्रवास करत होते अशी माहिती मिळते आहे. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस पिंपळेविहीरला जात होती. त्यावेळी त्यात २० प्रवासी होते. अचानक इंजिनजवळून धूर येऊ लागला. बस चालकाने प्रथम बसचा वेग कमी केला. नंतर बस रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. बसमध्ये आग पाहाताच प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले.
नवी मुंबईतही आग - आठवडाभरापूर्वीही खोणी-तळोजा रस्त्यावरील नागझरी बसस्थानकाजवळ नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला आग लागली होती. चालकाने प्रवाशांना वेळीच इशारा दिल्यामुळे जीवितहानी टळली होती. या आगीत बस जळून खाक झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अग्निशमन दलाच्या जवानांचा संशय होता. नवी मुंबई परिवहन महामंडळाची बस गुरुवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने येत होती. खोणी-तळोजा मार्गावर असताना नागझरी गावाजवळील बसस्थानकाजवळ बसमधून धूर येऊ लागला. चालकाने तात्काळ बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी बसमधून उतरताच बसने पेट घेतला. रस्त्याच्या दुतर्फा कंपन्या व गोदामे असल्याने या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अगीमुळे वाहतूक कोंडी : नवी मुंबई वाहतूक अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने बसमध्ये लाग विझवली होती. या आगीत बसच्या सीट सिस्टिमचे नुकसान झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली होती. यामुळे माहामार्गावर दोन्ही बाजुने वाहनांच्या रांग लागल्या होत्या.
स्कूल बस जळून खाक : त्या आधीही नवी मुंबईत एका स्कूल बसला आग लागली होती. शाळकरी मुलांना शाळेत सोडत असताना एका स्कूल बसला आग लागली. खारघर येथील घरकुल सेक्टर 15 समोर हा अपघात झाला. विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीत स्कूल बस जळून खाक झाली.
हेही वाचा - Bhima River Suicide: त्या सात जणांची आत्महत्या नव्हे तर खून महिलेला पळवल्याचा राग चुलत भावाने केले कांड