ETV Bharat / state

बर्ड फ्लूची धास्ती, आष्टी तालुक्यातील खिळद येथे 16 कोंबड्यांचा मृत्यू - bird flu in beed

अज्ञात रोगाने 16 कोंबड्या दगावल्याची घटना शनिवारी आष्टी तालुक्यातील खिळद येथे घडली.

16 hens died in Khilad beed district
बर्ड फ्लूची धास्ती, आष्टी तालुक्यातील खिळद येथे 16 कोंबड्यांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 31, 2021, 11:11 AM IST

आष्टी ( बीड) - परिसरात 16 कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याची घटना शनिवारी खिळद गावात घडली. मागील महिनाभरापासून शिरापूर, सराटे वडगांव, ब्रम्हगांव, पांगुळगव्हाण येथे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्यू झाला. आता खिळद येथे कोंबड्या दगावल्याचे समोर आले. तालुक्यातील कोंबड्यांचे मृत्यू सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये बर्ड फ्लूची भिती निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जे यांच्या परसातील 16 कोंबड्या शनिवारी दगावल्या. आजवर तालुक्यात अनेक पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू धास्ती असली तरी, आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण खिळद येथे मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमके कशाने झाला हे अहवाल आल्यावरच समजेल.

शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विष्णू साबळे, पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. अरूण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली. याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, अद्याप बर्ड फ्लूची केस समोर आलेली नाही. खिळद येथील कोंबड्यांचा अहवाल पाठवण्यात आला आहे. अहवाल येताच निदान समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार

हेही वाचा - हुंडाबळी! माहेरवरून पाच लाख न आणल्याने सासरच्यांनी काढला तिचा काटा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.