ETV Bharat / state

Coronavirus: तरुणाने स्वखर्चाने तयार केलेली बॉडी सॅनिटायझेशन मशीन कन्नड़ पोलिसांना दिली भेट - Kannad Police

पोलिसांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा, या हेतूने अनिस बागवान यांनी आपल्या व्यवसायातील उरलेल्या साहित्यातून बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करून गुरुवारी कन्नड शहर पोलीस ठाण्यास भेट दिली आहे. बागवान यांनी हे मशिन स्वखर्चातून बनवले असून त्यांनी दाखवलेल्या संवदेशीलतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Coronavirus: तरुणाने स्वखर्चाने तयार केलेली बॉडी सॅनिटायझेशन मशीन कन्नड़ पोलिसांना दिली भेट (प्रतिकात्मक छायाचित्र))
author img

By

Published : Apr 3, 2020, 8:19 AM IST

Updated : Apr 3, 2020, 1:12 PM IST

औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर लॉकडाऊन करण्यात आहे. यामुळे पोलीस कर्मचारी यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. पोलीस कर्मचारी हे सतत कर्तव्य निभवण्यासाठी घराबाहेर राहत असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची अधिक भीती असल्यामुळे या विषाणूपासून पोलिसांचा बचाव व्हावा, यासाठी कन्नड तालुक्यातील रेल येथील अनिस गफूर बागवान या अवलियाने स्वखर्चाने बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करून ते कन्नड शहर पोलिसांना भेट दिले आहे.

Coronavirus: तरुणाने स्वखर्चाने तयार केलेली बॉडी सॅनिटायझेशन मशीन कन्नड़ पोलिसांना दिली भेट

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी सतत परिश्रम घेत आहे. कर्तव्य बाजवण्यासाठी सतत घराबाहेर असलेल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला त्यांची अधिक चिंता सतावत असल्याने, पोलिसांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा, या हेतूने अनिस बागवान यांनी आपल्या व्यवसायातील उरलेल्या साहित्यातून बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करून गुरुवारी कन्नड शहर पोलीस ठाण्यास भेट दिली आहे.

अनिस बागवान यांचे रेल येथे वाहनांच्या बॉडी बनविण्याचा वर्कशॉप आहे. सर्व ठिकाणी लॉक डाऊन असल्याने आपल्या व्यवसायासंबंधी यूट्यूबवर व्हिडीओ पाहत असतांना त्यांना बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करण्याची कल्पना सुचली. यातूनच पुढे जाऊन त्यांनी आपल्याकडे असलेल्या साधन सामग्रीतून बॉडी सॅनिटायझेशन मशीन यार केले. यासाठी त्यांना साधारण आठ ते दहा हजार रुपये व दोन दिवसाचा वेळ लागला. बागवान यांनी स्वखर्चातून बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करून ते कन्नड शहर पोलीस ठाण्याला भेट स्वरूपात दिले.

पोलिसांच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता जागृत ठेवून बॉडी सॅनिटायझेशन मशीन तयार करून भेट दिल्याने गफूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सपोनि बालाजी वैद्य,भूषण सोनार,बलभीम राऊत,सर्जेराव जाधव,कैलास करवंदे,राजेंद्र मुळे,गणेश गोरक्ष,विनोद पाटील,प्रवीण बर्डे,रवींद्र ठाकुर,आनंद पगारे, रामू गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

Last Updated : Apr 3, 2020, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.