ETV Bharat / state

संत एकनाथ महाराजांच्या 422 व्या पुण्यतिथीनिमित्त विश्व शांती प्रार्थनेचे आयोजन

author img

By

Published : Apr 4, 2021, 11:58 AM IST

संत एकनाथ महाराजांच्या 422 व्या पुण्यतिथीनिमित्त विश्व शांती प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून फक्त पाच भक्तांच्या उपस्थित ही प्रार्थना झाली.

Paithan World Peace Prayer news
विश्व शांती प्रार्थना

औरंगाबाद(पैठण) - श्री क्षेत्र पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या 422 व्या पुण्यतिथीच्या पर्वावर विश्व शांती प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे मुख्य संयोजक प्राध्यापक चंद्रकात भराट यांच्या प्रमुख उपस्थितीत नाथ मंदिर समाधी परिसरात हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून फक्त पाच भक्तांच्या उपस्थित ही प्रार्थना झाली. जगातील कोरोना आजार कायमचा नष्ट होवो, जनता शांततामय जीवन जगत यशस्वी होवो, एकमेकांशी सौजन्याने, चांगल्या संस्काराने वागावे, राष्ट्रीय एकात्मता अखंड प्रेमपूर्वक राहो, जनतेवर कोणतेही संकट येऊ नये, सर्व धर्म समभाव या तत्त्वाने जीवन जगता यावे यासाठी ही विश्व शांती प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्थ मंडळाचे कार्यकरी विश्वस्थ दादा बारे, ह. भ. प. विठ्ठल महाराज चनघटे, उमेश महाराज दशरथे, राम महाराज झिंजुर्के, पांडुरंग महाराज झुंबड, अरूण काळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, प्रमोद दौड, संतोष तांबे उपस्थित होते. विलास खर्डेकर यांनी पसायदान म्हटले. महाराष्ट्राला परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते, राज्य छावा संघटनेचे अध्यक्ष, प्राध्यापक चंद्रकात भराट हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थानचे कार्यकारी विश्वस्थ दादा बारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग निरखे, महेश खोचे, धनराज चितलांगी, राजु लोहिया, मच्छिंद्र निवारे, मारूती वाणी, कैलास बोबडे, गजानन झोल, खंडु पवार, अमोल जाधव, विजय केसभट, शंकर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.