छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजी नगरमध्ये G20 अंतर्गत होणाऱ्या W20 परिषद 27 व 28 फेब्रुवारी होणार आहे. 20 देशातील 150 महिला प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत 10 राज्यातील महिलांसोबत चर्चा झाली. तर येणाऱ्या 4 महिन्यात इतर राज्यातील महिलांसोबत चर्चा होईल असे सांगितले. बचत गटातील महिलांचे प्रमोशन, घरगुती हिंसाचारापासून वाचण्यासाठी स्व संरक्षणाचे धडे, आर्थिक सक्षमीकरण असे अनेक मुद्दे या दहा राज्यातील महिलांसोबत झालेल्या चर्चेनंतर समोर आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधे पहिली परिषद: महिलांच्या इतर प्रश्नांवर W20 च्या तीन परिषदेमधे चर्चा होऊन G20 गटातील देश प्रमुखांना हा अहवाल ऑगस्ट दरम्यान सादर केला जाणार आहे. W20 ची छत्रपती संभाजीनगरमधे पहिली परिषद असुन दुसरी राजस्थानातील जयपूर व तमिळनाडूतल्या महाबलीपुरम येथे तीसरी बैठक होईल असे सांगितले. वैद्यकीय शाखेतील स्त्रीरोग तज्ञ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे कल कमी झाला आहे. या प्रश्नावर जागतिक पातळींवर अनेक नवनवीन अभ्यासक्रम असल्याने, तरुण इतर शाखांचा विचार करु शकतात. मात्र सध्यातरी स्त्रीरोग तज्ञ हा अभ्यासक्रम शीर्ष स्थानात येतो. या मुद्द्यावर W20 चर्चा करेल असे संध्या पुरेचा यांनी सांगितले. वेगवेगळ्या देशातील महिलांची सामाजिक स्थिती जरी वेगळी असली तरी, जागतिक पातळींवर सर्व विचार होऊ शकतो असेही एका प्रश्नावर बोलताना संध्या पुरेचा यांनी स्पष्ट केले.
परिषदेसाठी रोषणाईने उजळले शहर: जी-20 आणि वूमन-20 परिषदेनिमित्त विमानतळावर विविध प्रकारची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण शहर लग्नघराप्रमाणे नटले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या जी 20 बैठकीसाठी संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आले आहे. रस्त्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांचा चेहरामोहरा बदलला आहे. औरंगाबाद शहरातील रस्त्यांचे काम आणि सुशोभिकरणाचे काम युद्धपातळीवर पुर्ण केली असुन यात रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांची दुरुस्ती व रंगरंगोटी, रस्त्यालगतच्या भिंती व पुलांची रंगरंगोटी, पथदिवे बसवणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती, वाहतूक नियोजन अशी कामे केली.
महिला सक्षमीकरणाला वाव: प्रशासकीय स्तरावरही शिष्टमंडळाच्या दौऱ्याचे नियोजन व त्यांच्या निवास व इतर गोष्टींच्या चोख व्यवस्थेचे कामही युद्धपातळीवर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरात होत असलेली ही आंतरराष्ट्रीय शिखर परिषद डब्ल्यू 20 अर्थात वुमेन 20 या थीमला वाहिलेली आहे. तर दोन दिवसांत 125 जण यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतामधील महिला आणि बालविकास, तसेच जागतिक हवामान वाढीच्या आपत्तीस उपाययोजना आणि स्त्रियांच्या नेतृत्वात होणारा विकासाचा प्रवास यासह, अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. या होणाऱ्या परिषदेची उत्सुकता तर आहेच पण यामुळे महिला सक्षमीकरणाला वाव मिळेल. तसेच शहराचा जो चेहरा मोहरा बदलला आहे. त्याची जबाबदारी आम्हा शहरवासीयांच्या आहेत अशा प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर मधील महिलांनी दिल्या.