ETV Bharat / state

Vadgaon Kolhati Gram Panchayat: औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाचा एकहाती विजय - औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने सरशी केल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषतः शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत शिंदे गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाचे १८ पैकी ११ सदस्य निवडून आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाचा एकहाती विजय

author img

By

Published : Aug 5, 2022, 5:26 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने सरशी केल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेषतः शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत शिंदे गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. ( Vadgaon Kolhati Gram Panchayat Election ) शिंदे गटाचे १८ पैकी ११ सदस्य निवडून आले आहेत.

आ संजय शिरसाट यांनी मारली बाजी - औरंगाबाद शहराच्या जवळ असलेली वडगाव कोल्हाटी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची राहिली. शिंदे गटाचे विश्वासू आ संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत असल्याने ही निवडणुकी प्रतिष्ठेची मानली गेली. शिवसेनेतर्फे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासारखे नेते निवडणूक प्रचारात उतरले होते. ( victory Shinde group in Vadgaon Kolhati Gram Panchayat ) तर, दुसरीकडे शिंदे गटाचे आ संजय शिरसाट आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यात विजय शिंदे गटाचा झाला. यामध्ये १७ पैकी ११ जागांवर त्यांनी बाजी मारली ते शिवसेनेला ४ तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. हा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मतदारांनी विश्वास ठेवल्याने मिळाल्याचे मत शिंदे गट नियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे.

खैरे यांनी मार्गदर्शक व्हाव - वडगाव कोल्हाटी येथे पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी चांगलाच जोर लावला होता. मात्र, त्यांचे पुरस्कृत पॅनल पडले. यावेळी शिंदे गट नियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी टीका केली. चंद्रकांत खैरे यांना लोकसभेत मतदारांनी नाकारले आहे. ते ज्या उमेदवाराचा प्रचार करतील तो हमखास निवडणूक हारेल, त्यामुळे त्यांनी आता मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, आपल्या कार्यालयात बसून इतरांना मार्गदर्शन करावे असा सल्ला राजेंद्र जंजाळ यांनी दिला आहे.

हेही वाचा - विनायक राऊत दहावी दोनदा नापास; त्यांनी कायदा शिकवला तर, महाराष्ट्र संकटात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.