छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यात काही ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये तणाव आहे. ही परिस्थिती कोण निर्माण करत आहेत. कुठे औरंगजेबाचा फोटो ठेवला त्यामुळे दंगल निर्माण झाली असे बोलले जात आहे. याच मातीत औरंगजेबाला गाडले तिथे बसून बोलतोय. ज्यांना फोटो दाखवायचे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे. ज्यांनी स्टेटस् ठेवले त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या यांच्या सरकारच्या काळात असे कसे होते. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असे फोटो नचावतात म्हणजे तुम्ही अपयशी राहिले. पुण्यात डॉ. कुरलकर ज्यांनी देशद्रोह केला, त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. हे आरएसएस संपर्कातील लोक आहेत. पाकिस्तानसोबत हात मिळवणी करतात. औरंगजेबाचे फोटो दाखवणाऱ्या आणि स्टेटस् ठेवणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी.
सरकार अपयशी : इतर राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला. देशात मागील नऊ वर्षात वन साईड डायलॉग सुरू आहे. त्यांनी सांगायचे आणि आम्ही ऐकायचे. आम्ही बोललो तर जेलमध्ये टाकायचे. राहुल गांधी यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले पाहिजे, ते समोर येतात टीका सहन करतात. तुम्ही एकदा तर समोर या. सत्याला समोर जाण्याची हिंमत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
शिंदे-फडणवीस हे स्वत:ला शुद्ध हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात. मग तुमच्या सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले कसे जातात? म्हणजे तुम्ही अपयशी राहिले आहे - खासदार संजय राऊत
आताच का होते : अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, असे कधी झाले नाही. मागील सात आठ महिन्यात असे प्रकार होत आहेत. पाकिस्तान गुपित विकणारे सैन्यातील सापडले. धर्माच्या नावावर निवडणुका लढायच्या आहेत. हनुमानाच्या, हिजाबच्या नावावर निवडणुका लढल्या. मात्र मतदारांनी दाखवून दिले. आमची तयारी आहे म्हणून आम्ही निवडणुका घ्या असे म्हणत आहोत.
मतदार आमच्यासोबत : मराठवाड्यातील वातावरण महाविकास आघाडीसोबत पोषक आहे. संभाजीनगर परंपरागत गड आहे. जनता आमच्यासोबत एकजुटीने उभी आहे. निवडणुका कधीही झाल्या तरी आम्ही यश खेचून आणू. मात्र निवडणुका घेण्याची धमक यांनी दाखवावी. चौदा महानगर पालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजे. तुमचे सरकार चांगले काम करते ते गतिमान आहे. तर निवडणुका होऊन जाऊ द्या.
आमच्यात मतभेद नाहीत : शरद पवार यांच्या भूमिकेशी एकमत, ते आमचे नेते आहेत. जिंकेल त्याची जागा, आकडा वाढवण्यासाठी जागावाटप होऊ नये. आकडा वाढवून विरोधकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही लोकसभेला 18 जागांवर विजय मिळवला. खासदार निघून गेले तरी तिथला मतदार आमचा आहे. एकत्र बसून प्रत्येक जागेवर चर्चा होईल. प्रत्येक जागा आम्ही जिंकायला पाहिजे याबाबत आमचे एकमत आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेची आहे. हे सर्वांना माहीत आहे. काही ठिकाणी जागा वाटपावरून वाद असतील तर एकत्र बसवून मार्ग काढू. प्रत्येकाची एक पाऊल मागे जाण्याची तयारी आहेत. आमच्यात मतभेद नाहीत.
अनिल परब बरोबर बोलले : अनिल परब यांनी सांगितले ते बरोबर आहे. गेलेल्या आमदारांचा शिवसेनेच्या कार्याशी संबंध नाही. कच्ची मडकी आहेत. आम्ही कोणाच्या संपर्कात नाही. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहोत. सरकार काय करत आहे. आम्ही लोकांना भेटत आहोत. आमचे विरोधीपक्ष नेते आणि इतर नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजून घेत आहेत. बीआरएसची ताकद कशी वाढेल. त्यांनी त्यांच्या राज्यात पाहावे. त्यांच्या राज्यात काँग्रेसचे आव्हान आहे. त्यांना लवकर कळेल ते कुठे आहेत.
हेही वाचा -