ETV Bharat / state

औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात एका शेतातील वस्तीवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोड्याच्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Robbery
औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा
author img

By

Published : Jan 21, 2020, 2:37 PM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात शेतातील वस्तीवर अज्ञातांनी दरोडा टाकला. रमैय्यानगर वस्ती येथे हा दरोडा पडल्याची घटना घडली. घरातील सर्व सदस्य झोपले असता, चोरट्यांनी चाकू आणि लोखंडी रॉड यांच्या धाकाने हा दरोडा टाकला.

Robbery at Belgaon
औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा

हेही वाचा... 'साईबाबांनी जन्म कुठे घेतला, यापेक्षा मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्वाचे'

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलगाव शिवारातील रामैय्यानगर वस्तीवर राहणारे शेख शरीफ अनवर यांच्या घरावर हा दरोडा पडला. अनवर यांचे कुटुंब नेहमीप्रमाणे घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री बाहेरून आवाज देत दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर घरात प्रवेश करुन चाकू व लोखंडी राॅडचा धाक दाखवत, मारहाण करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचा... राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

यावेळी चोरट्यांनी शरीफ अन्वर शेख यांच्याकडे आलेले पाहुणे पिरन पिंजारी (65) यांच्या पायावर रॉड मारल्याने त्यांचा पाय मोडला. तसेच चोरट्यांनी अनवर यांच्या शेजारील घरातही दरोडा टाकला. रामा राशिनकर असे या शेजारच्यांचे नाव असून, त्यांच्या घरातून एकुण सत्तावीस हजारांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आला. चोरट्यांनी दोन्ही दरोड्यात एकूण ६७ हजार ३०० रुपयांचा माल लंपास केला आहे.

हेही वाचा... दुधाच्या भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव, अमूलने केला 'हा' आरोप

या घटनेची माहिती मिळताच रात्री डिवायएसपी गोपाळ राजनकर व वैजापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चोरट्यांचा शोध सुरू आहे. तसेच जखमींवर वैजापूर येथील उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:बेलगांव शिवारात दरोडा,नागरीक भयभीत,
वैजापूर तालुक्यातील घटना.दोघांना मारहाण

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात शेत वस्तीवर अज्ञात चोरट्यांचा दरोडा अज्ञात चोरट्यांनी रमैय्यानगर वस्ती बेलगाव शिवार येथे दरोडा टाकल्याची घटना दि.१८ रोजी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास घडली.Body:याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की बेलगाव शिवारातील रामैय्यानगर वस्तीवर राहणारे शेख शरीफ अनवर वय ३८हे व यांचे कुटुंब नेहमी प्रमाणे घरात झापले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री बाहेरून आवाज देऊन दरवाजा उघडाला लावला व घरात प्रवेश करुन चाकू व लोखंडी राॅडचा धाक दाखवत तसेच मारहाण करत घरातील एक तोळा सोन्याची २५ किमत पंचविस हजार दहा ग्रम सोन्याचे कानातील कुडके किंमत दहा हजार व रोख रक्कम पाच हजार व शरीफ अन्वर शेख यांच्या कडे आलेले पाहुणे पिरन पिंजारी वय 65 याच्या उजव्या पायाच्या पोटरी मारुन फॅक्चर केले व बेबी पिंजारी यांना लोखंडी राॅडने (टाॅमी )व मारहाण केली.Conclusion:तसेच लगत शेजारी राहणाऱे रामा राशिनकर यांच्या घरात घुसून चाकू व लोखंडी राॅडने मारहाण करीत रोख रक्कम दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची पोथ किंमत बारा हजार पाचशे रुपये व एक मोबाईल हॅन्डसेट फोन अंदाजे किंमत चार हजार आठशे रुपये अशीएकून सतावीस हजार तीनशे रुपये दरोड्यात लुट करून अज्ञात सहा चोरट्यांनी तेथून फरार झाले.
या दरोड्यात पिरन मन्सूरी (पिंजारी) बेबी मन्सूरी (पिंजारी) व संजय राशिनकर कविता राशिनकर असे सहा जणांना मारहाण करून जखमी करून दोन्ही दरोडा मिळून एकूण ६७ हजार ३०० रुपये दरोड्यात लंपास केले.
यांना वैजापूर येथील उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत .या घटनेची माहिती मिळताच रात्री डि वाय एस पी गोपाळ राजनकर व वैजापूर पोलीस ठाण्याचे पाटील ,फौजदार बायने, गवळी , बनकर व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व अज्ञात दरोडेखोराडाचा शोध घेत जखमींना उपचारासाठी वैजापूर येथे दाखल केले
याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख शरीफ अन्वर याची रक्कम चाळीस हजार रुपये व रामा राशिनकर यांची रक्कम २७ हजार ३०० असे दोन्ही मिळून दरोड्यात लुटलेली रक्कम ६७हजार ३००रुपये आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.