ETV Bharat / state

पोलीस अधीक्षकांनी केली कर्मचाऱ्यांची 'रियालिटी चेक' - aurangabad police news

तक्रादाराला पोलिसांकडून योग्य वागणूक मिळत नाही, अशी तक्रार अनेकवेळा ऐकायला मिळते. त्यामुळे कित्येक वेळा तक्रारदार पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत. मात्र, अशाप्रकारे खरंच पोलिसांकडून चुकीची वागणूक देण्यात येते का? याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी काही नागरिकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रादार म्हणून पाठवत आपल्याच हद्दीत पोलिसांच्या वागणुकीची वास्तविकता तपासणी केली.

reality-check-of-the-staff-done-by-the-superintendent-of-police
पोलीस अधीक्षकांनी केले कर्मचाऱ्यांचे रियालिटी चेक
author img

By

Published : Dec 14, 2019, 11:02 PM IST

Updated : Dec 14, 2019, 11:44 PM IST

औरंगाबाद - आपल्या हद्दीत पोलीस तक्रारदारांना कशी वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलीस ठाण्यांची वास्तविकता तपासणी केली. या तपासणीदरम्यान, तक्रादारांना योग्य वागणूक न देणाऱ्या पोलिसांना दंड ठोठावण्यात आला. तर चांगली वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले.

पोलीस अधीक्षकांनी केले कर्मचाऱ्यांचे रियालिटी चेक

हेही वाचा - मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कारभार सुधारण्याची नगरसेविका शितल म्हात्रेंची मागणी

तक्रादाराला पोलिसांकडून योग्य वागणूक मिळत नाही, अशी तक्रार अनेकवेळा ऐकायला मिळते. त्यामुळे कित्येक वेळा तक्रारदार पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत. मात्र, अशाप्रकारे खरंच पोलिसांकडून चुकीची वागणूक देण्यात येते का? याबद्दलची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी काही नागरिकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रादार म्हणून पाठवत आपल्याच हद्दीत पोलिसांच्या वागणुकीची वास्तविकता तपासणी केली.

पोलीस आणि नागरिकांमध्ये चांगले संबंध असावे यासाठी आपल्या हद्दीत असलेल्या पोलीस ठाण्यांची सत्यता पडताळणी केली. काही पोलीस ठाण्यात महिला तक्रारदारांना पाठवले तर काही पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी अन्य तक्रारदारांना पाठवले. दरम्यान, तक्रादारांनी तक्रार दिल्यावर पोलिसांच वर्तन कसं आहे, याबाबत आढावा घेतला असता काही पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी केलेलं वर्तन योग्य नसल्याचं समोर आले. तर काही ठिकाणी क्षुल्लक तक्रार असूनही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रादारांना योग्य वागणूक दिल्याचं देखील समोर आले.

या सगळ्या बाबींचा आढावा घेतल्यावर तक्रादारांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या खुलताबाद येथील ठाणे महिला अंमलदार आणि विरगाव येथील ठाणे अंमलदार यांना पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर काही क्षुल्लक तक्रारी असूनही तक्रादारांना चांगल वर्तन देऊन योग्य कारवाई करणाऱ्या सिल्लोड आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर काही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना योग्य कारवाई होत नसल्याने नोटीस देऊन कामात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तक्रारदार पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना योग्य रीतीने वागणूक देऊन त्याचे म्हणणं ऐकून योग्य कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस तक्रादाराला कशी वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी ही सत्यता पडताळणी केली असून यापुढे नागरिकांना पोलिसांच्या चांगल्या वागणुकीचा अनुभव येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केला.

Intro:आपल्या हद्दीत पोलीस तक्रारदारांना कशी वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांची रियालिटी चेक केलं. या तपासणीत तक्रादारांना योग्य वागणूक न देणाऱ्या पोलिसांना मोक्षदा पाटील यांनी दंड ठोठावला आहे. तर चांगली वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आलं.Body:पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रादाराला पोलीस योग्य वागणूक मिळत नाही अशी तक्रार अनेकवेळा ऐकला मिळते. मात्र पोलीस खरच तक्रादारांना कशी वागणूक देतात हे कळावं यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी काही नागरिकांना हाताशी घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रादार म्हणून पाठवत आपल्याच हद्दीत पोलिसांच्या वागणुकीचे रियालिटी चेक केले.Conclusion:औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये चांगले संबंध असावे यासाठी आपल्या हद्दीत असलेल्या पोलीस ठाण्यांची सत्यता पडताळणी केली. काही पोलीस ठाण्यात महिला तक्रारदार पाठवले तर काही पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार पाठवले. तक्रादारांनी तक्रार दिल्यावर पोलिसांच वर्तन कसं आहे याबाबत आढावा घेतला असताना काही पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी केलेलं वर्तन चांगलं नसल्याचं समोर आलं. तर काही ठिकाणी किरकोळ तक्रार असूनही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रादारांना योग्य वागणूक दिल्याचं देखील समोर आलं. एकत्रित आढावा घेतल्यावर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तक्रादारांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या खुलताबाद येथील ठाणे महिला अंमलदार आणि विरगाव येथील ठाणे अंमलदार यांना पाच हजारांचा दंड लावला. तर किरकोळ तक्रारीतही चांगलं वर्तन देऊन योग्य कारवाई करणाऱ्या सिल्लोड आणि गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर काही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना योग्य कारवाई होत नसल्याने नोटीस देऊन कामगिरी सुधाऱ्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस ठाण्यात तक्रारदार आनंदात जात नाही त्याची काही अडचण असते म्हणून तो पोलिसांकडे येतो. त्यामुळे तक्रारदार आल्यावर त्याच्यासोबत योग्य रीतीने वागणूक देऊन त्याच म्हणणं ऐकून योग्य कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस तक्रादाराला कशी वागणूक देतात हे जाणून घेण्यासाठी सत्यता पडताळणी केली असून यापुढे नागरिकांना पोलिसांच्या चांगल्या वागणुकीचा अनुभव येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केला.
Byte - मोक्षदा पाटील - पोलीस अधिक्षक
Last Updated : Dec 14, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.