औरंगाबाद - शहरात सर्रास गुटखा विक्री होत आहे. मात्र कारवाई होत नाही, अशी ओरड होत असतानाच बुधवारी संध्याकाळी सिटीचौक पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा मारत अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे.
अब्दुल वाहिद अब्दुल रशिद (५२, रा. खोकडपुरा), मोबीन खान फारुख खान (२६, रा. बुढ्ढीलेन), शेख अकिल शेख नईम ( २८, रा. बुढ्ढीलेन), अब्दुल आमेर अब्दुल मलीक (२८, रा. खाेकडपुरा), शेख सलमान शेख सरवर ( १९, रा. बुढ्ढीलेन), अब्दुल अलीम अब्दुल कय्युम (३४, रा. बुढ्ढीलेन), शेख हाफिज शेख शफी ( ३६, रा. नारळीबाग), फेरोज खान नजीर खान (४०, रा. बायजीपुरा) असे आरोपींचे नावे आहेत.
शहरात राजरोसपणे गुटखा उपलब्ध होत असल्याचा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः गुटखा गोडाऊनवर जाऊन छापा मारला होता. त्यानंतरदेखील खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर बुधवारी सिटीचौक पोलिसांनी हद्दीतीतील अनेक ठिकाणी छापा मारत आठ जणांना प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू सह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक दादाराव शिंगारे यांनी दिली आहे.