ETV Bharat / state

सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर अपक्ष लढणार - प्रभाकर पालोदकर विधानसभा निवडणूक २०१९

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. सिल्लोड येथे गुरुवारी रात्री झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालोदकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेताच काँग्रेस पक्षाने कैसर आझाद यांना उमेदवारी जाहीर केली.

प्रभाकर पालोदकर
author img

By

Published : Oct 4, 2019, 11:42 AM IST

औरंगाबाद - अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. सिल्लोड येथे गुरुवारी रात्री झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालोदकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेताच काँग्रेस पक्षाने कैसर आझाद यांना उमेदवारी जाहीर केली.

अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशानंतर भाजपच्या हक्काची जागा असलेला सिल्लोड मतदार संघ भाजपने शिवसेनेला सोडला. या घटनांमुळे सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत अब्दुल सत्तार यांचा पराभव करायचा असे ठरवत सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी रणनिती आखल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा - अब्दुल सत्तारांसाठी भाजपने सोडला हक्काचा मतदारसंघ !

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोबत बंड केले. या बंडानंतर सिल्लोड येथील काँग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे प्रभाकर पालोदकर यांना सत्तार यांच्याजागी काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. तर, दुसरीकडे सत्तार यांच्यासाठी भाजपने सेनेला जागा सोडल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यानंतर सिल्लोड येथे पालोदकर यांची ताकद लक्षात घेता नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना अपक्ष लढण्याची गळ घातली. तसेच सिल्लोड येथील सर्व भाजप पदाधिकारी भाजपचे मतदान मिळवण्यासाठी फिरतील असे आश्वासन पालोदकर यांना दिले.

हेही वाचा - राज्यात असदुद्दीन ओवैसींची तोफ धडाडणार, आठ ठिकाणी घेणार प्रचार सभा

त्यानुसार गुरूवारी रात्री सिल्लोड येथे गुप्त बैठक झाली. आणि त्या बैठकीत प्रभाकर पालोदकर अपक्ष लढणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सिल्लोड मतदार संघात शिवसेनेतर्फे अब्दुल सत्तार, काँग्रेस तर्फे कैसर आझाद आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर प्रभाकर पालोदकर अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'

Intro:अब्दुल सत्तार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रभाकर पालोदकर भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. सिल्लोड येथे गुरुवारी रात्री झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालोदकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेताच काँग्रेस पक्षाने कैसर आझाद यांना उमेदवारी जाहीर केली.Body:अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेश आणि त्यांनतर भाजपच्या हक्काची जागा असलेला सिल्लोड मतदार संघ भाजपने शिवसेनेला सोडला. या घटनांमुळे सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत अब्दुल सत्तार यांचा पराभव करायचा अस ठरवत सिल्लोड येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी रणनीती आखल्याच समोर येत आहे.Conclusion:लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस सोबत बंड केलं. या बंडानंतर सिल्लोड येथील काँग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे प्रभाकर पालोदकर यांना सत्तार यांच्याजागी काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्यासाठी भाजपने सेनेला जागा सोडल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यानंतर सिल्लोड येथे पालोदकर यांची ताकद लक्षात घेता नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना अपक्ष लढण्याची गळ घातली. सिल्लोड येथील सर्व भाजप पदाधिकारी भाजपचे मतदान मिळवण्यासाठी फिरतील अस आश्वासन पालोदकर यांना दिल. त्यानुसार गुरुवारी रात्री सिल्लोड येथे गुप्त बैठक झाली. आणि त्या बैठकीत प्रभाकर पालोदकर अपक्ष लढणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सिल्लोड मतदार संघात शिवसेनेतर्फे अब्दुल सत्तार, काँग्रेस तर्फे कैसर आझाद आणि भाजप कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर प्रभाकर पालोदकर अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.