औरंगाबाद - नेवासा तालुक्यातून जाणाऱ्या नगर-औरंगाबाद महामार्गावर कागोनी गावाजवळ खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ३ जण मृत्यू झालेअसून १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यावरुन औरंगाबादच्या दिशेने जात असलेल्या खासगी बसने समोर असलेल्या ट्रकला धडक दिली. अपघातानंतर खासगी बसचालक फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.