ETV Bharat / state

युती झाल्यास औरंगाबाद मध्यमध्ये एमआमएमला बसू शकतो फटका - Aurangabad centra

2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपच्या दोन्ही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती वीस हजारांहून अधिक आहेत.

एमआमएम
author img

By

Published : Sep 19, 2019, 10:49 AM IST

औरंगाबाद - शहरातील औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ 2014 च्या निवडणुकीत राज्यात चर्चिला गेला. प्रस्थापितांना धक्का देत एमआयएमने आपला पहिला आमदार निवडून आणला. इम्तियाज जलील यांनी या मतदारसंघात शिवसेना-भाजपचा पराभव केला. या मतदारसंघामध्ये मुस्लीम, दलित आणि हिंदू मतदार आहेत. संख्याबळ पाहता हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र, गत निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप वेगळी लढली आणि सहाजिकच मतांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज यांना झाल्याचे पाहायला मिळाले.

2014 ला औरंगाबाद मध्यमधून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार इम्तियाज जलील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून एमआयएमच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. एमआयएमकडून अतिक मोतीवाला, जावेद कुरेशी, फिरोज खान पटेल, मैफुजूर रहमान, डॉक्टर शमीन रिझवी, समीर साजिद आणि नाशेर कुरेशी यांच्यासह अनेक नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

हेही वाचा - पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार

2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपच्या दोन्ही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती वीस हजारांहून अधिक आहेत. या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप जरी एकत्र लढली तरीदेखील वंचित बहुजन आघाडीचा फटका मध्यच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती, तर भाजपकडून किशनचंद तनवाणी यांनी नशीब आजमावले होते. शिवसेना-भाजपमधील युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. गत निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपपेक्षा 2000 मते अधिक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील, असा दावा केला जात आहे. शिवसेनेकडून देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अनेकांना निवडणूक लढवायची आहे. ज्यामध्ये माजी आमदार प्रदीप जयस्वाल, बंडू ओक, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात, महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजप देखील हा मतदारसंघ स्वतःकडे मिळवण्यासाठीचे प्रयत्न निश्चित करेल. गत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली होती. काँग्रेसकडून एम.एम.शेख तर राष्ट्रवादीकडून विनोद पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र दोघांनाही पंधरा हजारापेक्षा कमी मते मिळाली आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. आघाडी असली तरी या मतदारसंघातूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार शोधावाच लागेल.

2014 च्या निवडणुकीमध्ये हे कोणाला किती मतं मिळाली होती हे पाहुयात.

इम्तियाज जलील - एमआयएम - 61 हजार 843
प्रदीप जयस्वाल - शिवसेना - 41 हजार 861
किशनचंद तनवाणी - भाजप - 40 हजार 770
विनोद पाटील - राष्ट्रवादी - 11 हजार 842

लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मते मिळाली यावरही एक नजर टाकूया

लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून 99 हजार 450 मते मिळाली होती. चंद्रकांत खैरे यांना 50 हजार 327 मते. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 30 हजार 210 मते, लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांची बेरीज जरी केली तरी इम्तियाज जलील यांना मिळालेली मते १९ हजारापेक्षा अधिक आहेत. एमआयएमतर्फे विजय मिळवल्यानंतर मतदारसंघात अनेक कामे केल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. शहराचा विकास मागे पडलाय तो पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

हेही वाचा - ईडी-पिडीची भीती आम्हाला दाखवू नका - धनंजय मुंडे

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तनवाणी आणि जयस्वाल यांना मिळालेली मतेही लोकसभेमध्ये हर्षवर्धन आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मता एवढीच आहेत. त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्याची एमआयएम आणि वंचितची इच्छा होती. याच जागेवरून वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई झालेली पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. युती झाल्यास या जागेवर युतीचा विजय होऊ शकतो, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - खासदार जलील यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा - आमदार डॉ. मनीषा कायंदे

औरंगाबाद मध्य हा शहरातील सर्वात जुना मतदारसंघ आहे. या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम मतदार संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांचे होणारे विभाजन या वरून भागातील आमदार निश्चित होतो. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघापैकी हा एक मतदारसंघ लक्षणीय असेल यात शंका नाही.

Intro:औरंगाबाद मध्य हा मतदार संघ 2014 च्या निवडणुकीमध्ये राज्यात चर्चिला गेला. कारण या प्रस्थापितांना धक्का देत एमआयएमने आपला पहिला आमदार निवडणून आणला.
इम्तियाज जलील यांनी या मतदारसंघात शिवसेना-भाजपा चा पराभव केला. या मतदारसंघाची रचना पाहता मुस्लिम दलित आणि हिंदू मतदारांची संख्या पाहता हिंदू
मतदारांची संख्या अधिक आहे. मात्र गत निवडणुकीमध्ये हे शिवसेना भाजपा वेगळी लढली आणि सहाजिकच मातांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज यांना झाल्याचं पाहायला
मिळालं.Body:2014 मध्ये औरंगाबाद मध्य मध्ये आमदार म्हणून निवडणून आलेले आमदार इम्तियाज जलील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून एमआयएमच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. एम आय एमआयएम कडून अतिक मोतीवाला, जावेद कुरेशी, फिरोज खान पटेल, मैफूजुर रहमान, डॉक्टर शमीन रिझवी, समीर साजिद आणि नाशेर कुरेशी यांच्यासह अनेक नेते निवडणूक
लढवण्यास इच्छुक आहेत.Conclusion:2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाच्या दोनही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती वीस हजारांहून अधिक आहेत. या निवडणुकीमध्ये हे शिवसेना-भाजपा जरी एकत्र लढली तरीदेखील वंचित बहुजन आघाडी चा फटका मध्येच्या या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून
प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढवली होती तर भाजपाकडून किशनचंद तनवाणी यांनी नशीब आजमावले होतं .शिवसेना भाजपाच्या युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. गत निवडणुकीमध्ये हे
शिवसेनेला भाजपापेक्षा 2000 मतं अधिक आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील असा दावा केला जातोय. शिवसेनेकडून देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अनेकांना निवडणूक लढवायची आहे. ज्यामध्ये हे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बंडू ओक , राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात, महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपा देखील हा मतदार संघ स्वतःकडे मिळवण्यासाठीचे प्रयत्न निश्चित करेल. गत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढली होती. काँग्रेस कडून एम.एम .शेख तर राष्ट्रवादीकडून विनोद पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र दोघांनाही
पंधरा हजारापेक्षा कमी मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. असलं तरी या मतदारसंघातूनही काँग्रेस-राष्ट्रवादीला
उमेदवार शोधावाच लागेल.
2014 च्या निवडणुकीमध्ये हे कोणाला किती मतं मिळाली होती हे पाहुयात.

इम्तियाज जलील एमआयएम यांना 61 हजार 843 मते
प्रदीप जयस्वाल शिवसेना यांना 41 हजार 861
किशनचंद तनवाणी भाजप यांना 40 हजार 770 मत
राष्ट्रवादीच्या विनोद पाटील यांना 11 हजार 842 मत..
लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मते मिळाली यावरही एक नजर टाकूया.
लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून 99 हजार 450 मते मिळाली होती चंद्रकांत खैरे यांना 50 हजार 327 मतं. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 30 हजार 210 मते, लोकसभा निवडणुकीमध्ये हे हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मतांची बेरीज जरी केली तरी इम्तियाज जलील यांना मिळालेली मते एकोणावीस हजारापेक्षा अधिक आहेत. एमआयएम तर्फे विजय मिळवल्यानंतर मतदार संघात अनेक काम केल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला. शहराचा विकास मागे पडलाय तो पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय.

Byte - इम्तियाज जलील - खासदार एमआयएम

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तनवाणी आणि जैस्वाल यांना मिळालेली मतही लोकसभेमध्ये हर्षवर्धन आणि चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मता एवढीच आहेत. त्यामुळेच या मतदारसंघातून लढण्याची एमआयएम
आणि वंचितची होती. याच जागेवरून वंचित मधून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतल्याचं बोललं जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेना-भाजपा विरुद्ध एम आय एम, वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढाई झालेली पाहायला मिळेल. अशी शक्यता आहे. युती झाल्यास याजागेवर युतीचा विजय शक्य होऊ शकतो अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Byte - संजय वरकड - राजकीय विश्लेषक

औरंगाबाद मध्य हा शहरातील सर्वात जुना मतदार संघ आहे. या मतदार संघात हिंदू आणि मुस्लिम यांची मतदार संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदार संघात मतांची होणार विभाजन या वरून भागातील आमदार निश्चित होतो. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मतदारसंघापैकी हा एक मतदार लक्षणीय असेल यात शंका नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.