ETV Bharat / state

कोरोनाला हरवायचे असेल तर घरातच साजरे करा 'सण', मोक्षदा पाटील यांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद, रक्षाबंधन, गणपती, मंगळागौर यासह छोटे मोठे कौटुंबिक उत्सव असतील ते यावर्षी टाळा. घरात साध्या पद्धतीने नियमांच्या अधीन राहून हे सण साजरे करा. पुढील वर्षी अधिक उत्साहाने दुप्पट आनंदाने सर्व उत्सव साजरे करू. मात्र, यावर्षी सर्वांनी संयम पाळा, शिस्त पाळा कारण कोरोनाला हरवायचे आहे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

मोक्षदा पाटील यांनी केले आवाहन
मोक्षदा पाटील यांनी केले आवाहन
author img

By

Published : Jul 30, 2020, 9:52 PM IST

औरंगाबाद : कोरोनाला हरवायचे असेल तर आतापर्यंत शासनाच्या नियमांचे जसे पालन केले तसेच करा. असे प्रतिपादन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. शहरातील पूर्णाकाकू किसनराव कोल्हे प्रबोधिनी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी, व्यासपीठावर नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक शहर रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक ग्रामीण सुनील नेवसे आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद, रक्षाबंधन, गणपती, मंगळागौर यासह छोटे मोठे कौटुंबिक उत्सव असतील ते यावर्षी टाळा. घरात साध्या पद्धतीने नियमांच्या अधीन राहून हे सण साजरे करा. पुढील वर्षी अधिक उत्साहाने दुप्पट आनंदाने सर्व उत्सव साजरे करू. मात्र, यावर्षी सर्वांनी संयम पाळा, शिस्त पाळा कारण कोरोनाला हरवायचे आहे. तसेच, पालकांनी तरुण मुला-मुलींना विनाकारण बाहेर पडू नये, असे समजावून सांगावे, असेही त्या म्हणाल्या. पोलीस यंत्रणा सर्व कार्यवाहीसाठी सक्षम असून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस कर्मचारी पॉ.कॉ. चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहेत. नागरिकांनी स्वतः सह कुटुंबीय लहान मुले, वृद्ध यांसह विशेषतः तरुण मुलांना, युवकांना कोरोनाविषयी समजावून सांगावे. तसेच कोरोनापासून स्वतः चे कुटुंबाचे शहराचे संरक्षण करावे, असे आवाहन केले.

यावेळी कोरोना योद्धा पो. नि. रामेश्वर रेंगे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मी कोरोनाबाधित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मला औरंगाबाद येथे उपचाराची व्यवस्था करत असल्याचे सांगितले. मात्र, मी कन्नड येथे उपचार घेतले. कन्नड येथील कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, सर्व कर्मचारी खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आज मी कोरोनावर मात करून कर्तव्यावर परत आलो आहे. वरिष्ठांचे पाठबळ सोबत असल्याने मनोबल वाढले आणि मी कोरोनावर मात करू शकलो, असे भाव त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी नगराध्यक्षा स्वाती कोल्हे म्हणाल्या, सर्व यंत्रणेमध्ये चांगला समन्वय आहे. तसेच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे आणि एकूणच पोलीस यंत्रनेने जोखीम पत्करून सुरुवातीपासून चांगले काम केले. यावेळी आताह मोहम्मद, प्रशांत शिंदे, मानसी जहागीरदार, हिराबाई वायकोस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव यांनी केले. बैठकीसाठी शहरातील सर्व समाजातील सर्व पक्षीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.