ETV Bharat / state

पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमविवाह गुन्हा? आता जळगावातही एका जोडप्याच्या जीवाला धोका - court

पोलिसांच्या बोलवण्यावरून परत गावी गेलो तर आमच्या जीवाला धोका असल्याची भीती विजया माळीने व्यक्त केली आहे.

जळगावातही एका जोडप्याच्या जीवाला धोका
author img

By

Published : May 8, 2019, 3:11 PM IST

औरंगाबाद - राज्यात प्रेमविवाह करणे जोडप्यांच्या जीवावर बेतत असल्याचे पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार ताजा असताना जळगाव येथील एका जोडप्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विजया माळी आणि प्रफुल्ल कुमावत याप्रेमी युगुलाने प्रेमविवाह केला. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी विवाहाला विरोध केला आहे. पोलीस देखील मदत करण्यास नकार देत असल्याचा आरोप जोडप्याने केला आहे.

जळगावातही एका जोडप्याच्या जीवाला धोका

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राहणाऱ्या प्रफुल्ल कुमावत या युवकाला आपल्या पत्नीसोबत जीव वाचवण्यासाठी गाव सोडून बाहेर भटकण्याची वेळ आली आहे. कारण प्रफुल्ल याने दुसऱ्या समाजाच्या असणाऱ्या विजया माळी या मुलीसोबत प्रेमविवाह केला. फेब्रुवारी महिन्यात दोघांनी न्यायालयात जाऊन रजिस्टर मॅरेज केले. इतकेच नाही तर त्याची एकप्रत संबंधित पोलीस स्टेशनला देखील दिली. मात्र पोलीस मुलीच्या कुटुंबियांच्या दबावात येऊन आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला धमकावत असल्याचा आरोप प्रफुल्लने केला आहे. लग्नात असलेल्या साक्षीदारांना आणि माझ्या कुटुंबियांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. विजया मिसिंग असल्याची तक्रार नोंदवून येत आम्हाला अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोप प्रफुल्लने केला.

पोलिसांच्या बोलवण्यावरून परत गावी गेलो तर आमच्या जीवाला धोका असल्याची भीती विजया माळीने व्यक्त केली आहे. विजयाचे काका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांच्या दबाववरूनच पोलीस मदत करत नसून आम्हाला तिकडे बोलावत आहेत, आम्हाला जवळपास तीनशे लोक शोधत असून आम्ही जर परत गेलो तर आमची जीव वाचणार नाही, अशी भीती विजयाला आहे. नगरजिल्ह्यातील घडलेली ऑनरकिलिंगची घटना ताजी असताना जळगाव जिल्ह्यातील नवविवाहित दांपत्याला जिवाच्या भीतीने बाहेर भटकाव लागत असल्याने, राज्यात अंतराजातीय विवाह करणारे जोडपे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:राज्यात प्रेमविवाह करणं जोडप्यांच्या जीवावर बेतत असल्याचं पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार ताजा असताना जळगाव येथील जोडप्याला जीवाचा धोका असल्याने वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

Body:विजया माळी आणि प्रफुल्ल कुमावत याप्रेमी युगुलाने प्रेमविवाह केला, मात्र दोघांची जात वेगळी असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी विवाहाला विरोध केलाय. इतकंच नाही तर पोलीस देखील मदत करत नसल्याचा आरोप जोडप्याने केलाय.

Conclusion:जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राहणाऱ्या प्रफुल्ल कुमावत या युवकाला आपल्या पत्नीसोबत जीव वाचवण्यासाठी गाव सोडून बाहेर भटकण्याची वेळ आली आहे. कारण प्रफुल्ल याने दुसऱ्या समाजाच्या असणाऱ्या विजया माळी या मुलीसोबत प्रेमविवाह केला. फेब्रुवारी महिन्यात दोघांनी न्यायालयात जाऊन रजिस्टर मॅरेज केलं. इतकंच नाही तर त्याची एकप्रत संबंधित पोलीस स्टेशनला देखील दिली. मात्र पोलीस मुलीच्या कुटुंबियांच्या दबावात येऊन आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला धमकावत असल्याचा आरोप प्रफुल्लने केलाय. लग्नात असलेल्या साक्षीदारांना आणि माझ्या कुटुंबियांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली असून विजया मिसिंग असल्याची तक्रार नोंदवून येत आम्हाला अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोप प्रफुल्लने केलाय.

byte - प्रफुल्ल कुमावत - पीडित मुलगा

पोलिसांच्या बोलवण्यावरून परत गावी गेलो तर आमच्या जीवाला धोका असल्याची भीती विजया माळीने व्यक्त केली आहे. विजयाचे काका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यांच्या दबाववरूनच पोलीस मदत करत नसून आम्हाला तिकडे बोलावत आहेत, आम्हाला जवळपास तीनशे लोक शोधत असून आम्ही जर परत गेलो तर आम्ही वाचणार नाही अशी भीती विजयाला आहे.

byte - विजया माळी - पीडित युवती

नगरजिल्ह्यातील घडलेली ऑनरकिलिंगची घटना ताजी असताना जळगाव जिल्ह्यातील नवविवाहित दांपत्याला जिवाच्या भीतीने बाहेर भटकाव लागत असल्याने राज्यात अंतराजातीय विवाह करणारे जोडपे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.