ETV Bharat / state

हुती विद्रोहींच्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता

Houthi Rebels Attack: लाल समुद्रात हुती विद्रोही व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत आहेत. (Red Sea) याचा परिणाम व्यापारावर होणार असून भारतात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या त्याचे परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात होतील असं आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. ढगे यांनी सांगितलं. घरगुती गॅस, बासमती तांदूळ, वस्त्र उद्योग, पेट्रोलियम पदार्थ यांच्या व्यापारावर परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे. (Inflation in India)

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 6:44 PM IST

Houthi Rebels Attack
वाढती महागाई
हुती विद्रोहीकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांच्या दुष्परिणामाविषयी सांगताना डॉ. ढगे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Houthi Rebels Attack : लाल समुद्रात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे महागाई वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे (Doctor Dhage) यांनी वर्तवली आहे. देशात ८५% टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात करतो. त्यावर मोठा परिणाम होईल. त्याच बरोबर निर्यात करताना देखील वस्तूची दरवाढ होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या त्याचे परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात होतील; मात्र असे हल्ले तिकडून देशावर होण्याची शक्यता नाही, असं देखील डॉ. ढगे यांनी सांगितलं.

महागाई वाढण्याची शक्यता : हुती विद्रोही लाल समुद्रात जहाजांवर ड्रोन हल्ला करत आहेत. याचा खूप मोठा परिणाम भारतीय बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस, बासमती तांदूळ, वस्त्र उद्योग, पेट्रोलियम पदार्थ यांच्या व्यापारावर परिणाम अधिक होण्याची शक्यता लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी वर्तवली आहे. विशेष करून युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय व्यापार करताना अडचण निर्माण होणार आहे. लाल समुद्रातून जाताना जहाजांवर होणारे हल्ले यामुळे मार्ग बदलावा लागेल. जर तसं करावं लागलं तर जवळपास ३५०० सागरी मैल एवढं अधिकचं अंतर कापावं लागेल. त्यामुळे वस्तुशुल्क वाढतीलच, त्याचबरोबर दोन ते तीन आठवड्यांचा प्रवास अवधी आयात-निर्यातसाठी वाढेल. यामुळे अधिकचा होणारा खर्च महागाईच्या रुपात सर्वसामान्यांना भरावा लागेल. विशेषतः भारत ८५% पेट्रोलियम पदार्थ बाहेरून आयात करतो. त्याच्या किंमती वाढल्यास महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केली. (Petroleum Products Expensive)

ड्रोनबाबत कायदा कडक होणार : हुती विद्रोही ड्रोनच्या माध्यमातून जहाजांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे हल्ले देशात होऊ शकतात. मात्र, असे प्रकार पाकिस्तान किंवा भारताच्या लगत असलेले देश करू शकतात. त्यामुळे ड्रोन संदर्भात नियमावली आणखीन कडक होऊ शकते. संरक्षण खात्यात ड्रोनचा वापर केला जातो. मात्र त्याचबरोबर खासगी स्वरूपातील ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. विशेषतः सोहळ्यांमध्ये समारंभात यांचा वापर अधिक आहे. मात्र आता ज्या पद्धतीने आगामी काळात हल्ल्यांची असणारी शक्यता पाहता, भारताकडून ड्रोन संदर्भात आणखीन कायदा सक्त केला जाऊ शकतो, असं मत देखील डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.

इस्रायल आणि हमास वाद चिघळणार: इस्रायलने हमासवर हल्ला केला आणि त्यांना नामोहरम केलं. त्यात आता हुती विद्रोही देखील जहाजांवर हल्ला चढवत आहेत. याबाबत आगामी काळात इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका देखील इतर देशांना मिळून टास्क फोर्स तयार करून हुती विद्रोही यांच्या विरोधात आघाडी तयार करत आहेत. त्यामुळे युद्धाचा अवाका वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा:

  1. मुंबईतच घरे मिळावीत या मागणीवर गिरणी कामगार संघटना ठाम, मुंबईबाहेर जाण्यास नकार
  2. 'त्या' महिला कॉन्स्टेबलला नियमानुसार सर्व सहकार्याची ग्वाही; वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची केली होती तक्रार
  3. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची पुन्हा 'वर्षा'वर भेट, तर्क वितर्कांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.