औरंगाबाद- जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1828 झाली आहे. 1126 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून 93 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या 609 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भारतमाता नगर (1), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (1), न्यू कॉलनी, रोशन गेट (1), भावसिंगपुरा (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), बेगमपुरा (1), चिश्तिया कॉलनी (1), फाझलपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), गांधी नगर (1), युनूस कॉलनी (2), जुना मोंढा, भवानी नगर (1), शुभश्री कॉलनी, एन सहा (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन 9 (1), आयोध्या नगर, एन सात (7), बुडीलेन (3), मयूर नगर, एन अकरा (1),विजय नगर, गारखेडा (3), सईदा कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), रोशन गेट परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), औरंगपुरा (2), एन आठ सिडको (1), समता नगर (4), मिल कॉर्नर (2), जवाहर कॉलनी (3), मोगलपुरा (2), जुना मोंढा (1), नॅशनल कॉलनी (1), राम मंदिर, बारी कॉलनी (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), देवडी बाजार (1), एन सात सिडको (1), एन बारा (1), आझाद चौक (1), टी.व्ही. सेंटर एन अकरा (1), कैलास नगर (1), या भागातील कोरोनाबाधित आहेत. एका रुग्ण कोणत्या ठिकाणचा आहे हे समजलेले नाही. यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय गरोदर कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 72, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, जिल्हा रुग्णालयात 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 93 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.