औरंगाबाद- दोन वर्षांपूर्वी शहरातील हिलाल नगरमधील एका प्लंबरची निर्घृण हत्या झाली होती. मृतदेहाच्या शरिरातील अनेक अवयव काढून त्यात दगड भरुन मृतदेह विहिरीत फेकला होता. याप्रकरणी कुख्यात आरोपी बबला उर्फ शेख वाजिद शेख असद यांच्यासह अन्य तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा- कांदा दरासाठी अनोखी शक्कल.. डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्याला पाठवली गांधीटोपी, उपरणे, साडी अन् कांदे
प्लंबर काम करणारा शेख जब्बार शेख गफ्फार याच्या निर्घृण हत्येमुळे औरंगाबाद शहर हादरले होते. या प्रकरणी न्यायालयाने चार जणांना दोषी ठरविले होते. न्यायालयाने या दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
बबला, त्याचा भाऊ शेख अमजद शेख असद उर्फ मोहसीन, सय्यद शहाबुद्दीन उर्फ शहाब सय्यद राशिद या आरोपींना दोषी ठरविले आहे. प्रत्येकाला 302 कलमाखाली सश्रम जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी सुनाविण्यात आली आहे. तसेच 201 कलमाखाली प्रत्येकाला तीन वर्षाची सक्तमजुरी, प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
शेख कलीम उर्फ कल्लू शेख सलीम यालादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पुराव्या अभावी मोहम्मद अलिमुद्दिन उर्फ सलीम अन्सारी मोहम्मद मिनाजउद्दीन, मोहम्मद रिहान मोहम्मद रिजवान व हमार रजा रियाज मेहंदी शहीद यांना निर्दोष सोडले. तर माफीचा साक्षीदार असलेला शेठ इम्रान ऊर्फ बाबा लोली चेक करीन यांची साक्ष यात महत्त्वाची ठरली आहे. यामुळे माफीच्या साक्षीदाराला न्यायालयाने सोडले आहे. तर जन्मठेप झालेल्या आरोपींना हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडे वाडकर यांनी काम पाहिले.