ETV Bharat / state

'सैराट' जोडप्यासह नातलगांना मुलीच्या कुटुंबीयाकडून मारहाण; वैजापूर तालुक्यातील घटना - मारहाण

प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलासह त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.

नवविवाहित जोडपे
author img

By

Published : May 26, 2019, 3:23 PM IST

औरंगाबाद - तरुण-तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातलगांनी आज सकाळी मुलाच्या घरी जाऊन त्याच्यासह नातेवाईकांना बेदम मारहाण केली. वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे ही घटना घडली.

घाटी रुग्णालय

वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील तरुणीची आणि नालेगाव येथील तरुणाची शिरूर येथील महाविद्यालयात ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. या तरुण आणि तरुणींने लग्न करायचे ठरवले. याबाबत दोघांनीही घरच्या मंडळींना माहिती दिली होती. मात्र, तरुणीच्या घरच्यांनी याला स्पष्ट नकार दिला. तरुणाच्या घरच्यांनी मात्र हा विषय तरुणावर सोपवला. या दोघांनीही १८ एप्रिलला पळून जाऊन न्यायालयात रितसर लग्न केले.

लग्न केल्यानंतर एप्रिलपासूनच हे जोडपे फरार होते. अखेर २ दिवसांपूर्वी हे दोघेही तरुणाच्या घरी दाखल झाले. ही माहिती तरुणीच्या घरी समजली. त्यांनी थेट नालेगाव येथे जाऊन तरुणाच्या घरी राडा केला. यात या जोडप्यासह मुलाकडील ४ ते ५ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नालेगाव येथे तणावाचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती शिरूर पोलीस ठाण्याला कळतात पोलिसांनी नालेगाव येथे धाव घेतली. त्यांनी मुलीकडील नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत जखमी झालेल्यांना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Intro:

18 एप्रिल पासून पसार झालेले सैराट जोडपे दोन दिवसापासून वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे परतले आहे. ही माहिती मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी नालेगाव येथे जाऊन सैराट जोडप्यास सह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
Body:वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील तरुणीची व नालेगाव येथील तरुणाची शिरूर येथील महाविद्यालयात ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुण व तरुणींनी लग्न करायचे ठरवले होते. याबाबत दोघांनीही घरच्या मंडळींना माहिती दिली होती. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या बाबीला साफ नकार दिला होता. तरुणाच्या घरच्यांनी मात्र तरुणावर हा विषय सोपवला होता. आखेर तरुण-तरुणींनी 18 एप्रिल रोजी पसार होत, रीतसर न्यायालयात जाऊन लग्न केले. आणि मागिन महिन्याभरापासून ते पसार होते. आखेर दोन दिवसापूर्वी तरुण-तरुणी लग्न करून तरुणाच्या घरी दाखल झाले. ही माहिती ती तरुणी च्या घरी कळाली. त्यांनी थेट नालेगाव येथे जाऊन तरुणाच्या घरी ऱाडा केला. यात सैराट जोडप्यास सह मुलाकडील चार ते पाच नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नालेगाव येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. ही माहिती शिरूर पोलीस ठाण्याला कळतात पोलिसांनी नालेगाव येथे धाव घेऊन मुलीकडील नातेवाईकांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्याना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत विरगाव पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.