ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन, लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नये, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. असे असतानादेखील औरंगाबादेत सोशल डिस्टन्सिंची पायमल्ली करत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे, पोलिसांनी चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत.

complaint-registered-against-14-people-for violating lockdown
लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : May 13, 2020, 9:06 AM IST

Updated : May 13, 2020, 12:24 PM IST

औरंगाबाद - देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातही सिडको, एन-३ भागातील नागरिकांना जमवून लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या चौदा जणांविरुध्द पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अनुप विजयप्रकाश आसोफा व दत्तात्रय विश्वनाथ जाधव यांच्यासह चौदा जणांचा समावेश आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नये, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत. असे असतानादेखील औरंगाबादेत सोशल डिस्टन्सिंची पायमल्ली करत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे, पोलिसांनी चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत.

लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या 14 जणांवर गुन्हा दाखल

सिडको, एन-३ भागात नागरिक एकत्र येऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सोमवारी रात्री पोलिसांनी एन-३ भागात धाव घेतली. त्यावेळी कैलास हाऊसिंग सोसायटीतील नागरिक सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता आसोफा व जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावरुन या दोघांसह चौदा नागरिकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : May 13, 2020, 12:24 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.